आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक ताण, अस्वस्थतेच्या उपचाराची नवी पद्धत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमिली नोरेन आठवड्यात एकदा प्रकाश नसलेल्या एका चेंबरमध्ये मीठयुक्त पाण्यात पोहतात. पाण्याचे तपमान त्यांच्या त्वचेच्या तपमानासमान असते. त्या ९० मिनिटे काहीच पाहत नाही. इअर प्लग लावल्यानंतर फक्त आपल्या श्वासाच्या मंद आवाजावर लक्ष केंद्रित करतात. काही लोकांना हा प्रकार भीतीदायक वाटू शकतो. मात्र, २९ वर्षीय नोरेन आणि त्यांच्यासारखे अन्य लोक पोटाचे विकार, कामाच्या ताणासह अन्य त्रासांतून सुटका करून घेण्यासाठी असे करतात.
अमेरिकेत गेल्या काही वर्षांत फ्लोट थेरपी ताण आणि दबावासारख्या मानसिक दडपणांपासून सुटका करून घेण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरत आहे. सुरुवातीला याला एलएसडी नशेने पीडित लोकांचा मानसिक उपचार समजून डावलण्यात आले होते. वैज्ञानिक समुदायाचे लोक याला ध्यानाचा शॉर्टकट मानतात. याव्दारे लोक कमी श्रमांमध्ये निवांतपणा आणि शांततेच्या स्थितीत पोहोचू शकतात. लारेट ब्रेन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या फ्लोट क्लिनिकचे डायरेक्टर जस्टिन फीनस्टीन यांचे म्हणणे आहे की, फ्लोट थेरपी संवेदना वाढवण्याची सोपी पध्दत आहे.

फ्लोट थेरपी मुख्य प्रवाहातच प्रवेश करत आहे. अमेरिकेत २०११मध्ये ८५ फ्लोट सेंटर होते. एकाग्रता प्रसिद्ध व्हायला लागल्यावर त्यांची संख्या वाढून २७१ पर्यंत पोहोचला. आता पोर्टलँड, ओरेगावमध्ये वार्षिक फ्लोट कॉन्फरन्स होत आहे. काही आरोग्य नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या एक डझनपेक्षा अधिक अभ्यासांचे निष्कर्ष, स्वस्थ लोकांसाठी फ्लोट थेरपी तणावमुक्त होण्याचा प्रभावी उपाय आहे. यामुळे रक्तदाब कमी होतो. स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलच्या प्रमाणात कमतरता येते. अद्याप हे समजू शकलेले नाही की, ताण, उदासीसारख्या मानसिक प्रकारांत फ्लोट थेरपीने फायदा होतो की नाही.

संशोधक या दिशेने काम करीत आहेत. इंटरनॅशनल स्ट्रेस मॅनेजमेंट जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार तणावातून निर्माण झालेल्या लोकांची फ्लोटेशनने बेचैनी कमी झाली आहे.पुढच्या वर्षी फीनस्टीन पोस्ट स्ट्रेस ट्राॅमेटिक डिसऑर्डरने प्रभावित लोकांमधील प्रभावाचा अभ्यास करणार आहे. त्यांना अपेक्षा आहे की, फ्लोटिंगनंतर बेचैनीशी संबंधित मेंदूतील कार्याची हालचाल मंदावू शकते. फ्लोटिंगला पुढे वाढवण्यात मदत मिळेल. फीनस्टीन म्हणतात, संशोधनासाठी आणखी संशोधक लागतील.

फ्लोटिंग कसे काम करते
इअर प्लगमुळे लोक भवतालीचे आवाज ऐकू शकत नाही. त्यांचे लक्ष फक्त शरीराचे आवाज, हृदयाची धडधड, श्वासोच्छ‌्वासाकडे असते. ध्यानाच्या स्थितीत पोहोचण्यास सहायक.
अंधार असल्याने मेंदूला सक्रिय करणारे उत्प्रेरक मिळू शकत नाही.
बाहेरील जगापासून वेगळे असल्याने आंतरिक जागरूकतेच्या स्थितीत पोहोचतो.
चेम्बरची हवा आणि टाकीच्या पाण्याचे तपमान ३४ डिग्री सेल्सिअस राहते. त्यामुळे शरीराला तपमानानुसार स्वत:मध्ये बदल करावा लागत नाही.
७५७ लिटर पाण्याने भरलेल्या टाकीत ४५४ किलो अॅप्सम नावाचे मीठ मिसळले जाते. ते पाण्यामध्ये चटई किंवा गालिच्यासारखे काम करते. मांसपेशी आणि मेंदूला आराम मिळतो. फीनस्टीन सांगतात, ही शून्य गुरुत्वाकर्षणाच्या नजीकची स्थिती आहे.
बातम्या आणखी आहेत...