आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आले इको फ्रेंडली कपडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृदू आणि श्रुतीच्या डिझायनिंगची खासियत आहे रसायनविरहीत फॅब्रिक आणि पर्यावरणपुरक कपडे. ते चांगले आणि टिकावूही अाहेत. श्रुती आणि मृदू पुण्यात फॅशन डिझायनिंग कोर्सदरम्यान भेटले आणि आयुष्यभरासाठी त्यांची मैत्री झाली. त्यावेळी त्यांना हे माहितही नव्हते की ते पुढे चालून व्यावसायिक भागीदारही बनतील. त्यांनी आपले लेबल बायस २०१४ मध्ये लॉँच केले. यात त्यांनी रोज वापरात येणाऱ्या वस्तूंच्या डिझाइनला आधार बनवले. नंतर त्याला ड्रेसचे स्वरुप बहाल केले. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण सुरक्षेचा केलेला विचार. आपल्या डिझायनिंगचे रिसायकल केलेल्या फॅब्रिकचाच त्या उपयोग करतात. जे जास्त टीकावू असते. मग ते पॉलिस्टर का असेना. प्रत्येक फॅब्रिक एक वेगळीच कहाणी सांगत असते.
मृदू यांचे पिता एअरफोर्समध्ये होते. त्या देशाच्या वेगवेगळ्या भागात राहिल्या आहेत. त्यांच्या डिझाइनमध्येही ही विविधता नेहमीच बघायला मिळते. त्या सांगतात की बाएस शब्दाचा वापर साधारणपणे निगेटिव्ह अर्थाने घेतला जातो. आम्ही हे नाव यासाठी वापरले की त्याद्वारे आपल्या वस्त्रातील विरोधाभास दाखवला जाईल. आमची कपडे महिलांसाठी आहेत. मात्र त्यातील सूत पुरुषांच्या कपड्यांसाठीही वापरता येऊ शकेल. त्या पुढे सांगतात की फॅशनचे अनेक पैलू आहेत. मात्र आम्ही यात ग्लॅमरला कमी महत्त्व देतो. कारण सर्वसामान्यही याच्याशी जोडले जावेत.

त्यांच्या एसएस १७ कलेक्शनला अननोन प्लेजर हे नाव देण्यात आले आहे. यात पॉलिस्टरचा वापर जास्त आहे. याची खासियत म्हणजे पेट बॉटलला रिसायकल करून हे तयार केले आहे. बेस कॉटन कपड्याने तयार केला आहे. तो रंगवण्यासाठी केमिकलचा वापर कटाक्षाने टाळला आहे. मृदू सांगतात की, फॅशन अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे. याद्वारे आम्ही पर्यावरण रक्षणाचाही संदेश देऊ इच्छितो. यात आमच्या बालपणीच्या आठवणीही दडलेल्या आहेत. ज्या कुठेतरी ताज्या आहेतच. त्यांच्या कलेक्शनमध्ये मुख्यपणे तीन रंग- हिरवा, क्रीम आणि काळा. त्यांचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. मात्र याचा मुख्य हेतू कम्फर्ट हा आहे.
फॅशन & स्टाइल
अिस्मता अग्रवाल
फॅशन लेखिका, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...