आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Couple Enjoy Their Life To Extent And Inspire Us

या कपलसारखी रोमॅंटिक लाईफ करा एन्जॉय, घ्या जिवनाचा पुरेपुर आस्वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरा-बायकोमधील नातं कसं असावं याचा तुम्ही कधी विचार केलाय. नाही ना. कोड्यात पडलाय. विचार करताय... तर फोटोग्राफर, अॅथलिट जय अलवर्राज आणि त्याची गर्लफ्रेंड अॅलेक्सिस रीनी यांचे फोटो तुम्ही बघायला हवेत. या कपलने इन्साग्राम या फोटोशेअरींग वेबसाईटवर अगदी हटके फोटो शेअर केले आहेत. त्यावरुन दोघांचे आयुष्य अगदी कमालिचे आश्चर्यकारक आणि मॅजिकल असल्याचे दिसून येते.
जगभरातील आश्चर्यांना आणि वेगवेगळ्या ठिकाणांना दोघे नियमितपणे भेट देतात. त्यानंतर रोमॅंटिक फोटो काढायलाही दोघांना मनापासून आवडते. त्यात ते जराही कुचराई करीत नाही. तारुण्य अगदी अखेरच्या कणापर्यंत एन्जॉय करण्याला दोघे प्रॉयॉरिटी देतात. आयुष्य दोघे पुरेपुर जगतात असे या फोटोंवरुन सिद्ध होते.
आपल्या आयुष्यात जे काही आहे त्याचा जास्तीत जास्त उपभोग कसा घ्यावा याची प्रेरणा या कपलवरुन मिळते. पैसा आयुष्यात आवश्यक आहे, यात शंका नाही. पण तरीही प्रेम आणि रोमांच आयुष्याला मोहरुन टाकतो. त्यातून आयुष्याचा खरा आनंद लुटता येतो. मग खिशात एक रुपया असो किंवा कोट्यवधींची रास.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या कपलचे रोमॅंटिक फोटो... हे फोटो बघून तुम्हीही या जगात नकळत हरखून जाल... तुमचे आयुष्य मनापासून एन्जॉय कराल...