आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tips For Office Work With Team News At Divya Marathi

TIPS - टीम सदस्यांना परस्परांचे प्रतिस्पर्धी समजू नका...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लोबल कंपनीतील टीममधील कर्मचारी वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक असतात. त्यांच्यामधील मतभेद कमी करणे आणि टीमवर्कची भावना निर्माण करण्यासाठी अनौपचारिक संवाद, हा उत्तम उपाय आहे. मोठे ध्येय गाठण्यासाठी सल्लागाराची भूमिका महत्त्वाची असते. टीममधील कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठीच्या टिप्स मधून…
कॉमन व्हिजनमुळे मतभेद कमी
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध देशांचे कर्मचारी असल्याने मतभेद होण्याची शक्यता जास्त असते. हे मतभेद कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. कर्मचारी वेगवेगळ्या विभागातील असले तरी एक समूह म्हणून काम करणे आवश्यक असते. टीम सदस्य परस्परांचे प्रतिस्पर्धी समजण्याऐवजी त्यांची भूमिका समजून घ्यावी. जॉब सिक्युरिटीसह सर्व कर्मचाऱ्यांना एक समान ध्येय ठरवून द्यावे. प्रत्येक देशात कामाची पद्धत आणि प्रक्रिया वेगळी असते. मात्र कंपनी स्वत:च्या स्टाफविषयी जागृत राहिल्यास मतभेदांचे प्रमाण कमी होईल.
सर्वात म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये अनौपचारिक संवाद असावा. कार्यालयातील कर्मचारी दैनंदिन कामासह इतर विषयांवर चर्चा करत असतात, तेव्हाच परस्परांबाबत विश्वास निर्माण होतो मतभेदांचे प्रमाण आपोआपच कमी होऊ लागते.
(स्रोत: 4 वेज टू डिक्रीज कॉन्फ्लिक्ट विदिन ग्लोबल टीम्स, पामेला हाइंड्स)
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा इतर टिप्स....