अरेंज मॅरेज, भारतातील खुप जुनी प्रथा आहे. लग्न करण्याची ही पध्दत अनेक पिढ्यापासुन चालत आलेली आहे. या प्रथेमध्ये दोन्ही कुंटूंबांच्या सल्ल्याने दोन व्यक्तींना जोडले जाते आणि त्यांचे लग्न केले जाते. जर तुम्हीसुध्दा लवकरच अरेंज मॅरेज करणार आहात तर तुम्हाला काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतील.
आपण अनेक वेळा पाहतो की, इंगेजमेंट नंतर पार्टनर एकमेकांसोबत तासंतास बोलतात, बोलणे ही चुकीची गोष्ट नाही परंतु यावेळी काही गोष्टी लक्षात घेणे खुप गरजेचे आहे. चला तर मग पाहुया कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.
1. जास्त दिर्घ माहीती देऊ नका
जर तुमची अरेंज मॅरेज होणार असेल तर आपल्या कुंटूंबाविषयी जास्त माहीती देऊ नका. तुमचे आई-वडील आणि भाऊ-बहीनी सोबत संबंध कसे आहेत, यांविषयी जास्त माहीती देऊ नका.
2. कौटुंबिक माहीती
कुंटूबातील लोकांचे आपसातील संबध. त्यांची परिस्थिती ही चांगली असो किंवा वाईट ते सांगु नका. चांगले राहील की सर्वात आधी तुम्ही त्यांना समजुन घ्या आणि नंतर बाकीच्या गोष्टींवर लक्ष द्या.