आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : व्यवसायाला नवीन नाव द्या, नक्कीच प्रगती होईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या १५दिवसांमध्ये मला दोन व्यक्ती भेटल्या. त्यांचे व्हिजिटिंग कार्ड काहीसे वेगळे होते. एकाने स्वत:ला नाईफ कोच सांगितले होते तर दुसऱ्याने ऑटोमोबाइल डॉक्टर. माहिती घेतल्यावर काळाले की, त्यांनी आपल्या नावालादेखील असे रंग-रूप दिले आहे.
नाइफ कोच : वॅसिलिकाबॅल्टाटीनू स्वत:ला नाइफ कोच म्हणवून घेणाऱ्या दुबईच्या पहिल्या महिला आहेत. त्या कॉस्मेटिक सर्जरीचे रुग्ण प्लास्टिक सर्जन्स यांच्यामध्ये दुव्याचे काम करतात. पैशावाल्यांमध्ये आजकाल सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्याचे प्रचलन वाढत आहे. अशा स्थितीत वॅसिलिका ग्राहक (रुग्ण) आनंदी राहील, याची पूर्ण काळजी घेतात. कुणाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिपोसक्शन करायचे असते. तर कधी १५-१६ वर्षांची मुले गायनोकोमॅस्टियाच्या उपचारासाठी येतात. कुणाला हॉलीवूडची नायिका ब्रॉजेलिना जॉलीसारखे नाक पाहिजे कुणी जबडा, हनुवटी किंवा गाल सुंदर करायचे आहे. त्या रुग्णाचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून शहर जगातील डॉक्टरांविषयी सांगते. रुग्णाने निवडलेल्या डॉक्टरांशी भेट घालवून देण्याची व्यवस्थाही करतात. अनेकदा स्वत:च रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जातात.
आपल्या क्लाइंटला शस्त्रक्रियेत कोणत्या प्रकारची जोखीम असू शकते, याची माहिती देतात. पूर्वी नंतर कोणती सतर्कता बाळगावी. उदा. लिपोसक्शनसाठी अनेक प्रकारच्या मशीन असतात. एखाद्याच्या त्वचेसाठी एक मशीन योग्य असू शकते तर दुसऱ्यासाठी दुसरी. सामान्यत: ही माहिती डॉक्टर व्यग्रतेमुळे रुग्णांना सहजपणे देऊ शकत नाही. येथे त्यांचे संशाेधन कामी येते. अमेरिकेत ५० हजार लोकांमागे एक, तर दुबईमध्ये १८ हजार लोकांमागे एक प्लास्टिक सर्जन आहे. हेच कारण आहे की, वॅसिलिका यांनी या क्षेत्रात करिअर निवडले. कामाला नवीन नाव दिले आणि याच्या आधारे आता त्या यशस्वी होत आहेत.
ऑटोमोबाइल डॉक्टर : मुंबईच्याशांताक्रुझमध्ये आर. व्ही. मणी मेकॅनिक होते. कार गॅरेजमधून चांगली कमाई होत असल्याने ते आनंदीही होते. परंतु मुलगा व्यवसायात नवीन काही करू इच्छित होता. तो सध्या एका अग्रगण्य इन्स्टिट्यूटमध्ये एमबीएचे शिक्षण घेताेय. दरम्यान त्याने वडिलांसोबत एका कल्पनेवर काम केले. मुंबईतील परिस्थितीने या कल्पनेवर काम करण्यास प्रेरित केले. मुंबईमध्ये चांगल्या ड्रायव्हरची कमी असल्याने बहुतांश लोक स्वत:च कार चालवतात. परंतु इंजिनविषयी माहिती नसते. कुणीतरी वेळोवेळी आपली कार कशी चालत आहे हे सांगावे, अशी त्यांची इच्छा असते. गाडीचा एखादा पार्ट नादुरुस्त झाला का आणि झालाच तर कधी, कुठे कसा दुरुस्त करावा. या गरजेने मणी त्यांच्या मुलाला मार्ग दाखवला. दोन महिन्यांच्या संशोधनाने मणी यांचे रूप पालटून टाकले. पूर्वी नेहमी त्यांच्या नखांवर ग्रीस लागलेले आणि कपडेदेखील मळलेले असत. परंतु आता सर्वकाळी झकपक, अगदी स्वच्छ आहे. कारण आता ते मेकॅनिकपासून गाड्यांचे डॉक्टर झाले आहे. आपल्या गॅरेजवर नियमितपणे येणाऱ्या ग्राहकांपासून सुरुवात केली. डॉक्टरासारखे घरी जाऊन चार वेळेस गाडी चेक करून हजार रुपये घेतात. मणी गाडी पाहिल्यानंतर सल्ला देतात. या आधारे त्यांचे ग्राहक नेहमीच्या मेकॅनिककडे जाऊन गाडी दुरुस्त करून घेतात.यामुळे अचानक येणाऱ्या अडचणींवर मात करतात. आणि मणी? त्यांनी हे काम सुरू करायला अवघे सहा महिने झाले आहेत. एवढ्या कमी काळातच त्यांचे ११२ स्थायी ग्राहकदेखील बनले आहेत. यापासून त्यांना दर महिन्याला १.१२ लाख रुपयांची आमदनी होत आहे.
फंडा हा आहे की...
नियमित व्यवसायात देखील थोडा बदल करून त्याला नवीन रूप दिले जाऊ शकते. नवीन नाव दिले जाऊ शकते. यामुळे लोकांमध्ये जिज्ञासा जागी होईल. ते तुमच्याकडे येतील आणि जर तुम्ही क्वॉलिटी सर्व्हिस दिली तर तुमची प्रगती निश्चित आहे.