आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, शाकाहारा सारख्याच असणा-या व्हिगन आहार पद्धतीबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डमी फोटो )
सध्या लोक शाकाहारी, मांसाहारी होत नाहीत, तर त्यांची पसंती वीगन होण्यास आहे. त्यामुळे जगभर व्हिगन डायट वेगात प्रचलित होत आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये प्रकाशित पेटाच्या एका लेखानुसार अमेरिकेत २.५ टक्के नागरिक व्हिगन डायट घेत आहेत. मात्र व्हिगन असते तरी काय? याची माहिती जाणून घ्या.
व्हिगन डायट स्वीकारण्याची सोपी पद्धत : शाकाहारी लोकांना व्हिगन डायट अंगीकारणे तेवढे जास्त कठीण नाही. मात्र, मांसाहारी लोकांना पहिल्यांदा शाकाहारी व्हावे लागते. काही काळ शाकाहारी अन्न खाल्ल्यानंतर हळूहळू मध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आहारातून हद्दपार केले जातात. ते प्लांट-बेस्ड डायट घेतात.
जीवन शैलीतून बाहेर : कडक व्हिगन्स अॅनिमल प्रॉडक्ट्सना आपल्या जीवनशैलीतून काढून टाकले जाते. उदा : कपडे, कॉस्मेटिक,बूट-चप्पलमध्ये अॅनिमल प्रॉडक्ट्सचा वापर होत नाही. लेदर,फर, रेशीम,लोकर यांचाही ते वापर करत नाहीत.
व्हिगन संदर्भात मान्यवरांचे मत
^ प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर व्हिगन बनण्याची प्रेरणा मिळाली.
- ब्रायन अॅडम्स
^ मला शरीराचे कब्रस्तान करण्याची इच्छा नव्हती.
- जॉर्ज बर्नर्ड शॉ

यामुळे वाढत आहेत वीगन्स :
बहुतांश लोकांनी आरोग्याची काळजी घेत व्हिगन डायट घेतात. काही अभ्यासानुसार अॅनिमल फॅट किंवा प्रोटीनमुळे कॅन्सर, मधुमेह, हायपरटेंशन किंवा हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. ऑक्टोबर २०१२ मध्ये फूड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित एका लेखानुसार प्लांट-बेस्ड डायट खाल्ल्यामुळे जनुकीय समस्या उदा. टाइप २ मधुमेह, कॅन्सर आणि कार्डियोवेस्कुलर आजाराचा धोका होतो. धान्य,फळ,भाज्यांमध्ये कोलेस्टेरॉल किंवा सॅच्युरेटेड फॅट्सची मात्रा कमी असते. प्राणी हक्क किंवा पर्यावरणाशी संबंधित लोकांचा व्हिगन डायटकडे जास्त कल आहे.

व्हिगन सोसायटी : जगभरात व्हिगन सोसायटी आहे. प्राणी किंवा पर्यावरणाला होणारे नुकसान रोखण्यासाठी याची स्थापना केली आहे. लोकांचा कल व्हिगन डायटकडे वाढवणे आणि या आहार पद्धतीमुळे पर्यावरण तसेच प्राण्यांना किती फायदा होतो ते पटवून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. सर्व औषधांची प्राण्यांवर चाचणी केली जाते त्यामुळे व्हिगन सोसायटी औषध घेण्यास मज्जाव करत नाही.

डायटमध्ये हे सर्व काही : व्हिगन डायटमध्ये सर्व फळ-भाज्या,धान्य,बीन्स,शेंग भाज्यांचा समावेश आहे.
विविध आहार पद्धती...
एगिटेरियन
जे लोक शाकाहारी भोजन घेतात. मात्र, अंडीही खातात त्यांना एगिटेरियन म्हटले जाते. मात्र, हा आहार घेणारे मांसाहारी म्हणजे मटण, चिकन, मासे आदींचे सेवन करत नाहीत. त्यांच्या डेअरी डायटमध्ये डेअरी प्रॉडक्ट्स आदी समाविष्ट आहेत.
शाकाहारी

आपल्या देशात शाकाहारी आहार सर्वाधिक प्रसिद्ध आहे. हा आकार करणारे लोक मांसाहार व अंड्यांपासून लांब राहतात. हे लोक सर्वप्रकारची फळे,भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ उदा. दूध,तूप,लोणी आदींवर अवलंबून असतात. म्हणजे डायट प्लांट-बेस्ड जास्त असते.

मांसाहारी

विदेशात ही आहार पद्धती प्रसिद्ध आहे. हे डायट घेणारे मांसाहारावर जास्त अवलंबून असतात. याशिवाय ते शाकाहारी पक्वान्न, फळे-भाज्या, अंडी, डेअरी प्रॉडक्ट्स आदी खाऊ शकतात. म्हणजे या लोकांना जगातील प्रत्येक पदार्थ खाण्याचे स्वातंत्र्य आहे.
व्हिगन

हा एकप्रकारे शाकाहारी आहार आहे. मात्र, हा आहार घेणारे मटण किंवा अंडी नव्हे तर दुधापासून बनवलेले सर्व पदार्थ आणि प्रत्येक प्रकारचे अॅनिमल इंग्रिडियंटपासून दूर राहतात. हे लोक अॅनिमल प्रॉडक्ट्सपासून प्रोसेस्ड फूडचा प्रयोग करत नाहीत. ते केवळ फळे, भाज्या खातात.
प्रोटीनसाठी वीगन्स खाऊ शकता...
बीन्स(शेंगा)
बीन्समध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. यामध्ये राजमा, चवळी,वाल, हरबरा आदींचा समावेश आहे. यापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. ते सॅलड किंवा सूपमध्ये टाकू शकतो. अन्य भाज्यांमध्येही ते घातले जाऊ शकते.

सोया उत्पादन
यात प्रोटीन जास्त असते. प्रोटीनला पूरक म्हणूनही याचा उपयोग करू शकतो. सोया उत्पादनात टोफू,सोया दूध आणि सोया योगर्ट सामील आहेत. डेअरी प्रॉडक्टऐवजी याचे सेवन केले जाऊ शकते. तीन औंस टोफूमध्ये(सोया दही) १४ ग्रॅम, सिल्कन टोफूच्या तीन औंडसमध्ये ४.१ ग्रॅम प्रोटीन असते.

सुका मेवा

प्रोटीन व्यतिरिक्त यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडची मात्रा जास्त असते. त्यासाठी पाइन नट्स,आक्रुड,भोपळा बिया,फ्लॅकसीड, सुर्यफूल बिया खाऊ शकता. पीनट बटरही फायदेशीर राहील.
हे पण खाऊ शकता : ग्रीन पीस, हेम्प, शिआ सीड्स,सीसम, पॉपी सीड्स,कोको पावडर(अनस्वीटन्ड), लेन्टिल्स, पिन्टो बीन्स,स्पेगिठी,बदाम, पालक,ब्रोकली, होल-व्हीट ब्रेड आदी.