आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Intake Can Be Increased By Eating Fruits And Vegetables

उन्हाळ्यात खावेत हे 16 पाणीदार फळे आणि भाज्या, आरोग्यासाठी आहेत फायदेशीर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 ते 10 ग्लास पाणी पिणे हेल्दी मानले जाते. परंतु नवीन संशोधनानुसार आपण यातील अर्धे पाणी हे आपल्या आहारातून घेतले पाहिजे. 'The Water Secret'चे लेखक आणि यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामध्ये प्रोफेसर डॉ. होवार्ड म्यूराडनुसार तुम्ही किती पाणी पिता यापेक्षा तुमच्या शरीरात किती पाणी राहते हे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर शरीराला पाण्याची जास्त गरज असते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

जास्त पाणी पिल्याने व्हिटॅमिन आणि मिनरल्स बाहेर निघतील...
डॉ. होवार्डनुसार, जास्तच पाणी पिल्याने फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकते. जास्त पाणी पिल्याने शरीरातील आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्स यूरिनमधून बाहेर पडतात. यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते.

खा पाणी असणारे फळे आणि भाज्या...
- डॉ. होवार्डनुसार जास्त पाणी पिण्याऐवजी पाणी असणारी फळ जास्त खा. या फळांच्या स्ट्रक्चरमध्ये पाणी राहते ज्यामुळे हे हळु-हळू रिलीज होते. या कारणाने शरीरात पाणी नेहमी टिकून राहते.
- भाज्या आणि फळांमधील पाण्यामुळे बॉडीमधील पाण्याची गरज पुर्ण होते. यासोबतच भाज्या आणि फळे प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन आणि मीठाची कमतरता पुर्ण करतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणकोणते फळे आणि भाज्यामध्ये जास्तीत जास्त पाणी मिळू शकते...