आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wheat Flour Halwa Recipe Read More At Divya Marathi

RECIPE : असा बनवा पौष्टीक पिठाचा हलवा, लहान ते मोठे सगळेच होतील खुश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला अगदी झटपट गोड खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही पिठाचा हलवा करू शकता. हा हलवा खाण्यासाठी खुपच स्वादिष्ट असतो.विशेष म्हणजे हा बनवण्यासाठी जास्ती वेळ लागत नाही. आज आम्ही तुम्हाला पिठाच्या हलव्याची रेसिपी सांगणार आहोत.
ही रेसिपी 4 व्यक्तींसाठी आहे
तयार होण्यास लागणारा वेळ - 30 मिनिटे
आवश्यक साहित्य :
पिठ - 100 गॅम (1 कप)
तुप - 80 गॅम (1/3 कप)
साखर - 100 गॅम (अर्धा कप)
काजू - 10 (छोटे-छोटे कापलेले)
पिस्ते - 8-10 ( लांब-लांब कापलेले )
किशमिश - 1 टेबल स्पून
छोटी इलाइची - 4-5 (बारीक कूटलेली )
कृती :
सर्वात आधी एका कढ़ाईमध्ये 40 गॅम तुप गरम करून घ्यावे. पिठ चाळून घेऊन ते गरम झालेल्या तुपामध्ये टाकून चांगले एकत्र करून घ्यावे. साधारण नारंगी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यावे. आता यामध्ये घेतलेल्या पिठाच्या तिप्पट पाणी (3 कप पाणी) व साखर टाकावी. पिठाचे गोळे जाईपर्यंत चांगले हलवत राहावे.
पिठाचे गोळे कमी झाले असतील तर आता तुम्ही यामध्ये कापलेले काजू व किशमिश टाकावे. हलक्या आचेवर सर्व एकत्र करून हलवा शिजण्यासाठी ठेवावा. हलवा खाली लागू नये म्हणून सतत चमच्याने हलवत रहावा. हलवा थोडासा घट्ट झाल्यासारखा वाटला की, त्यामध्ये 20 गॅम तुप टाकून हलवावे. कढईच्या किना-याला हलवा चिकटणे कमी झाल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये इलाइची व थोडेसे तुप टाकावे. हा झाला तुमचा चविष्ट पिठाचा हलवा तयार. एखाद्या भांड्यात काढून त्यामध्ये कापलेले काजू पिस्ते टाकून मस्तपैकी सजवू शकता.
पुढील स्लाइडवर पाहा, पिठाच्या हलव्याचा व्हिडिओ....