आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Doesn’T Want To Live A Longer And Healthier Life?

या 6 पदार्थांमुळे तुम्ही राहाल हेल्दी आणि निरोगी; वाढेल आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सुविधा मिळत आहेत त्याच्य पद्धतीने आपल्या शरीरात आजारांचे प्रमाण वाढत आहे. आज भारतामध्ये मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. जरी आपल्या हातात जगणे आणि मरणे नसले तरी आपण आपले शरीर निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करु शकतो. तुमचे शरीर देखील निरोगी राहावे यासाठी आज आम्ही तुम्हाला काही पदर्थांची माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

1-डार्क चॉकलेट

जर तुम्हाला चॉकलेट खाणे आवडत असेल तर आजपासून डार्क चॉकलेट खाणे सुरु करा. डार्क चॉकलेटमध्ये एंटी-ऑक्सीडेंट असल्याने हृदय आणि बुद्धीची ग्लूकोज लेवल नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये फ्लैवोनॉयड्स असल्याने हे एंटी-एजिंग देखील आहे. डार्क चॉकलेट खाल्ल्याने ब्लड क्लॉट आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा भिती कमी होते.