आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टनरवर जास्त प्रेम करणे नाही चांगले, जाणुन घ्या कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक म्हण आहे की, अति तेथे माती... कोणतीही गोष्टी अधिक प्रमाणात केली तर चांगली वाटत नाही. असेच प्रेमाच्या बाबतीत देखील आहे, जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपण विचार देखील करु शकत नाही की, तो व्यक्ती नसला तर आपले जीवन कसे असेल. मग आपण त्याला मिळवण्यासाठी आणि आपल्या कडे टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. ज्या कारणामुळे त्याच्यावर बंधन येतात आणि कळत नकळत त्याला दुःख देखील पोहोचते. अनेक वेळा यामुळे नात्यात दुरावा येतो. आज आपण प्रेम दिर्घ काळ टिकुन राहण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आणि जास्त प्रेम कसे घातक ठरु शकते हे सांगणार आहोत... चला तर मग पाहुया...

1. स्वतंत्रतेवर प्रतिबंध
जास्त प्रेम केल्याने तुम्ही तुमच्या पार्टनरच्या वयक्तीक स्वातंत्र्यांवर गदा आणतात. तुम्ही त्याच्यावर जास्त प्रेम करता त्यामुळे त्याला चिड येते. या काळात तुम्ही पार्टनरच्या प्रत्येक कामात नजर ठेवतात ज्यामुळे त्याला डिसटर्ब होते. त्याला वाटते की, तुम्हाला त्याच्यावर थोडाही विश्वास नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... अतिप्रेम करणे का चांगले नसते...