स्वार्थी बनणे चुकीचे आहे, हे लहानपणापासूनच शिकवले जाते. मात्र, अनेकदा स्वार्थी बनणे गरजेचेदेखील असते. आयुष्यात असे अनेक चढ-उतार येतात, जेव्हा तुम्हाला स्वार्थी होऊनच विचार करावा लागतो. तुम्ही जर स्वार्थी होऊन विचार करत नसाल तर भविष्यात तुमचेच नुकसान होते. निर्णय तुमच्या हातात आहे.
१.नात्यांमध्ये कटुता येते तेव्हा
नात्यांमध्ये कितीही कटुता आली तरी नाते तोडणे महिलांसाठी खूप कठीण असते. मात्र, त्याच वेळी तुम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी स्वार्थी व्हावे लागेल. समाज काय म्हणेल, हा विचार करून तुम्ही अनेकदा गप्प राहता. मात्र, असे करणेदेखील घातक ठरते.
आपल्या नात्यासाठी एका प्रामाणिक प्रयत्नानंतरही परिस्थिती सुधारत नसेल तर ते तोडलेलेच बरे.
पुढील स्लाइडवर वाचा कधी व्हावे स्वार्थी...