आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्शनमध्ये विविध व्हरायटी, कॉलेज कॅम्पसमध्ये विंटर फॅशनची चलती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदा विंटर कलेक्शनमध्ये विविध व्हरायटी आल्या आहेत. जीन्सवर वूलन कुर्ती त्यावर कोट किंवा सिंपल सूट वर फूल कोट अशी फॅशन सध्या सुरू आहे. फॅशनचा हा नवा ट्रेंड सध्या विद्यापीठ आणि कॉलेज परिसरात दिसून येत आहे. थंडी वाढल्यामुळे शहरातील कॉलेज कॅम्प्समध्ये फॅशनची टशन दिसू लागली आहे.
खास करून मुलींच्या फॅशनमध्ये विविध ट्रेंड आला आहे. मुली निऑन कलर आणि ब्राइट कलरला मोठ्या प्रमाणात पसंती देतात. तर मुलांमध्ये रफ अँड टफ स्टाइल पसंत केली जाते. मुले जीन्ससोबत वुलन टी-शर्ट वर हाफ जॅकेट घालणे पसंत करतात.

लवकर येते फॅशन
मेट्रोच्या धरतीवर शहरातील विद्यापीठ, कॉलेजमध्ये नवी फॅशन लवकर दिसून येते. फॅशन तज्ज्ञांच्या मते आता औरंगाबाद- नांदेड, नागपूर सारख्‍या शहरामध्ये देखील मेट्रोबरोबरच फॅशन येत आहे. आधी हा ट्रेंड काही दिवसाने येत होता मात्र आता शहरातील तरुणाई फॅशनमध्ये अपडेट होत आहेत. त्यामुळे शहरातील कपड्यांचे दुकानाचे मालकदेखील लेटेस्ट ट्रेंड घेऊन येतात.
विंटर फॅशन विषयी वाचा पुढील स्‍लाईडवर...