आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावामुळे मातृत्व सुखाकडे पाठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मातृत्वाच्या जबाबदार्‍यांचा तणाव आल्याने अनेक महिला या सुखाकडे पाठ फिरवतात. देशातील १० ते १५ % लोकसंख्येला वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासले आहे. २१ ते ३१ वर्षे वयोगटातील तरुण जोडप्यांना या समस्येला तोंड द्यावे लागते. चुकीची जीवनशैली, लग्नाचे वाढलेले वय, उशिरा प्रसूती यासोबतच जबाबदार्‍यांनी भांबावून जाणे ही याची मुख्य कारणे आहेत. हे अनेक स्तरांवर प्रभाव टाकते.

- तणावामुळे जोडीदाराशी संबंधांत गोडवा राहत नाही. दर महिन्यात महिलांमध्ये बीजांड निर्मितीनंतर (आेव्ह्यूलेशन)चे ४८ तास विंडो पीरियड असतो. या काळात गर्भ राहण्याची सर्वाधिक शक्यता असते. हा काळ निसटला की पुन्हा १ महिन्याची वाट पाहावी लागते.
- वंध्यत्वाचे मुख्य कारण पीसीआेएसदेखील तणावामुळेच निर्माण होते. तणावामुळे धूम्रपान,मद्यपानासारख्या सवयी जडतात. यामुळे आरोग्य ढासळते व वंध्यत्वाची समस्याही उद््भवते.
- कार्टिसोलसारख्या तणावजन्य हार्मोनमुळे शरीरातील मुख्य सेक्स हार्मोन जीएनआरएचवर विपरीत परिणाम होतो. यामुळे आेव्ह्युलेशन प्रक्रियाही बाधित होते.
- गर्भ राहील का, ही शंकाही महिलांना ग्रासते. त्यामुळेही गर्भधारणा होत नाही. त्यातच कुटुंबीयांचा दबाव, त्यामुळे निर्माण होणारा तणावही समस्येत भरच घालतो. तणावग्रस्त महिलांमध्ये आयएफचा सक्सेस रेट कमी असल्याचे गर्भधारणा उपचारादरम्यान दिसून आले आहे. याबाबतीत काळजी घ्या...

तणावाचे निर्मूलन- तणाव आहार, झोप व व्यायामावर दुष्परिणाम करतो. भरपूर झोप- झोप कमी पडल्यास शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडते. ७ ते ८ तास झोप आवश्यक आहे.

भयग्रस्त राहू नका- गर्भधारणेविषयी भय बाळगू नका. जोडीदाराशी संवाद साधा. तणाव दूर करण्यासाठी अवधी घ्या. ज्या महिलांना भ्रूण रोपणानंतर १५ मिनिटांनी विनोदी वा हास्य शो दाखवला गेला, त्यांच्यात आयव्हीएफच्या यशाचा दर इतर महिलांच्या तुलनेत दुप्पट असल्याचे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. तणाव आणि नैराश्यापासून दूर राहणे हे अत्यावश्यक आहे.

डॉ. ललिता बडवार, अपोलो रुग्णालय, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...