आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आहार - खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मिळते या आजारांना निमंत्रण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले आरोग्य सर्वाधिक आपल्या जेवणावर अर्थात आहारावर अवलंबून असते. एखादा व्यक्ती दिवसातून दोन तास व्यायाम करत असेल आणि धावत असला, परंतु त्याच्या जेवणाची पद्धत योग्य नसेल तर तो कधीच निरोगी राहू शकणार नाही. आपण भारतीयांमध्ये ही समस्या आणखी मोठी आहे. कारण जगातील खान पानाच्या सर्वात वाईट सवयी असलेल्या लोकांमध्ये असून वर्कआऊटसारख्या बाबींवर लक्ष देत नाही.
आपला सामान्य आहारदेखील तेल आणि मसालेयुक्त असतो. याचा आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. याच सवयींमुळे देशात लाइफ स्टाइल डिसीजेसचा ताण सातत्याने वाढत आहे. याच्या परिणाम स्वरूप देशात कम्प्लसिव्ह ईटिंग डिसऑर्डरदेखील झपाट्याने वाढत आहे. कम्प्लसिव्ह ईटिंग डिसऑर्डर म्हणजे भूक लागलेली नसतानाही सारखे काहीना काही खात राहण्यासारखी सवय होय.

तणाव, स्टँडर्ड लाइफ स्टाइल आणि वेगाने पुढे जाण्याची मनीषा यामुळे देशातील कम्प्लसिव्ह ईटिंग डिसऑर्डरमध्ये वाढ होत आहे. कुणी कामाच्या तणावात जबरदस्ती काही खाताहेत तर काही जण टीव्ही पाहताना टाइमपास करण्यासाठी ओव्हर ईटिंग करत आहे.
जेवणाच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक गंभीर आजार जडू शकतात. बॅड इटिंग हॅबिट‌्समुळे होणाऱ्या काही आजारांवर नजर टाकू या....