आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी ओळखा चमचमीत Sweets मधील भेसळ, राहा सावध, आरोग्य ठेवा ठणठणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. पण आता याला स्विट्स, खरेदी आणि फटाक्यांचाही सण म्हटले जाते. दिवाळीत स्विट्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. दिवाळीतील कोणताही दिवस असो स्विटमार्टमधून काही ना काही गोड पदार्थ घरी आणले जातात. विशेष म्हणजे पूजेसाठी किमान पेढे तरी आणण्याची प्रथा जवळपास सर्वच घरांमध्ये दिसून येते. आता अचानक एवढी मोठी मागणी वाढल्याने या खाद्यपदार्थांमध्ये बऱ्याचदा भेसळ केली जाते. जरा सावध राहुन आणि घरी जरा साधी पद्धत अवलंवून तुम्ही स्विट्समधील भेसळ ओळखू शकता. असे पदार्थ खाण्यापासून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना रोखू शकता.
खोव्यातील, चेन्नातील भेसळ अशी ओळखा
स्विट्स तयार करण्यासाठी खोव्याचा वापर केला जातो. पण या खोव्यात बऱ्याच वेळा भेसळ झालेली दिसून येते. त्यात प्रामुख्याने स्टार्च टाकून भेसळ केली जाते. ती ओळखण्यासाठी मिठाईचा तुकडा पाण्यात गरम करा. त्याला गार होऊ द्या. त्यानंतर त्यात आयोडीन सोलूशनचे काही थेंब टाका. त्याचा रंग निळा झाला तर समजा त्यात स्टार्चचा वापर करण्यात आला आहे. तसेच स्विट्स विकत घेण्यापूर्वी त्याची चव घेऊन बघा. स्विट्स जर आंबट, तुरट किंवा जरा वेगळी चव वाटत असेल तर घेऊ नका. तसेच स्विट्सचा वास येत असेल, त्याच्या तारा तुटत असतील तरीही ते स्विट्स घेण्याचे टाळा. स्विट्स कोणत्या वातावरणात तयार केले आहेत, याचीही तपासणी करुन बघा. बऱ्याच वेळा स्विटमार्टचे किचन फारच खराब असते. त्यातील वातावरण किळसवाणे असते. फार खराब वातावरणात असे पदार्थ तयार केले जातात. ते आधी तपासूनच स्विट्स विकत घ्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतरही खाद्यपदार्थांमध्ये कशी केली जाते भेसळ.... अशी ओळखा दुध, पनीर, मध, मिरचीपुड, धनेपुड, जिरे आदी पदार्थांमधील भेसळ...