आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही लाडू-पेढे नव्हे विष खाताय, घरीच असे ओळखा भेसळयुक्त पदार्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाडवाचंपीठ बेसनाचं की लाखेच्या डाळीचं? मिठाईतला खवा दुधाचा की बटाट्याच्या लगद्याचा? बर्फीवरचा वर्ख चांदीचा की अॅल्युमिनिअमचा? हलव्यावरच्या कांड्या शुद्ध केशराच्या की मक्याच्या रंगवलेल्या तुऱ्याच्या? करंज्यांमधलं पुरण साखरेचं की खडूच्या गोड भुकटीचं? शंकरपाळ्यांची तळणी शुद्ध तुपाची की वनस्पतीजन्य पदार्थांची? बुंदीचा पाक पिठीसाखरेचा की धुण्याच्या सोड्याचा?
पोट दुखायला लागल्यावर किंवा मळमळायला लागल्यावर तुम्हाला हे प्रश्न पडू नयेत, म्हणून आधीच सावध राहा. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत मिठाई आणि फराळाच्या पदार्थांची उलाढाल बाजारपेठेत कोट्यवधींच्या घरात जाते. हजारो किलो खवा, बेसन पीठ, साखर आणि तेल-तूप याची उलाढाल होते. पुरवठ्यापेक्षा मागणी अनेक पटींनी वाढते. अशा वेळी भेसळीची मोठी चलती असते. सणांच्या काळातील या भेसळीवर नियंत्रण आणणे जिल्ह्यातील चार-पाच अधिकाऱ्यांच्या अावाक्याबाहेरचे असते. म्हणूनच लोकांनीच जागरूक होऊन भेसळ ओळखणे गरजेचे आहे. मात्र, हा प्रकार बराचसा तांत्रिक आणि किचकट असल्याने भेसळ नेमकी कशी ओळखावी, असा प्रश्न उभा राहतो. त्यासाठी ‘दिव्य मराठी’ने या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहजसोप्या, घरच्या घरी करता येण्याजोग्या प्रयोगांची आखणी केली आणि विविध ठिकाणांहून नमुने गोळा करून त्याचे परीक्षणही केले. बाजारात सहज उपलब्ध असलेल्या काही घटकद्रव्यांचा वापर करून त्यानुसार कुणीही भेसळ त्वरित ओळखू शकतो. कसे ते जाणून घ्या...
ग्राहकांसाठी आवाहन...
- खुले पदार्थ, मिठाई कधीही विकत घेऊ नका.
- स्वस्त पदार्थांच्या जाहिरातींना भुलू नका
- कुठल्याही अन्नपदार्थांची खरेदी केल्यावर त्यांची बिले घ्या.
- ब्रँडेड पदार्थांची, मिठाईची खरेदी करा
- खरेदी करताना नेहमी पॅकेटवरील बॅच क्रमांक, उत्पादनाची तिथी तपासून पाहा.
घरच्या घरी भेसळ ओळखण्यासाठी आवश्यक साहित्य
- पदार्थांचे नमुने
- काचेचे भांडे किंवा पेला
- काचेची नळी
- टिपकागद (स्टेशनरीच्या दुकानात मिळतो)
- आयोडीन (औषधांच्या दुकानात मिळते)
- हायड्रोक्लोरिक अॅसिड (फरशी स्वच्छतेचे)
- सल्फ्युरिक अॅसिड
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कशा प्रकारे ओळखावी भेसळ...
बातम्या आणखी आहेत...