आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Comments On Devendra Fadnavis Official Page

Facebook Jokes : \'राष्ट्रवादी\'च्या पाठिंब्याशिवाय 264 धावांबद्दल रोहितचे अभिनंदन...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट गजतात एकाच खेळीमध्ये २६४ धावा काढून रोहित शर्माने अनोखा विक्रम नोंदवला आहे. आज भारतातच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वातून रोहित शर्मावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकतेच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्रिकेटमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी चांगली कामगिरी करत मुख्यमंत्रीपद आपल्या पदरी पाडून घेतले. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे हा चाहता वर्ग त्यांच्यावर टिकेची झोड उठवताना दिसत आहे. या चाहत्यांनी देवेंद्र फडणवीसांना चांगलेच धारेवर धरले आहे. याचे उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या अधिकृत फेसबुक पेजवर काल रोहित शर्माचे अभिनंदन करणारा एक फोटो अपलोड करण्यात आला. मात्र या फोटो खालील कमेंट ह्या अनपेक्षितच होत्या. लोकांनी रोहित शर्माचे तर अभिनंदन तर केलेच त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच खडे बोल सुनावले तर काहींनी चांगलेच विनोद केले आहेत. रोहित शर्माने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय रोहित शर्माने 264 धावा केल्याबद्दल सर्वांनी उपहासात्मक विशेष अभिनंदन केले. तर काहींनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी केलेले मत परत मागितले आहे.
Divyamarathi.com घेऊन आलाय देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरील काही खास कमेंट तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर पाहा, देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरील विनोदी कमेंट...