आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडंबन " केम छो ' मिस्टर प्राइम मिनिस्टर " 'जय श्री कृष्ण ', आता ही काय नवीन भानगड़ ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
" केम छो ' मिस्टर प्राइम मिनिस्टर "
' जय श्री कृष्ण '
हे काय आता नवीन ? ' केम छो ' हे दोन शब्द शिकण्यासाठी आठवडा गेला , आता ही काय नवीन भानगड़ ?
भानगड़ नाही हो , आम्ही एकमेकांना भेटलो ना की जय श्रीकृष्ण असे म्हणतो।
अरे , एक काही तरी म्हणत जा ना , आम्ही बघा बर , हेलो , हाउ आर यु ' असे बोलतो , एक नकली स्माइल देतो आणि पुढे निघून जातो।
ह्या ! आमच्याकडे एवढे मोजक कुणीही बोलत नाही। आम्ही बडबड़े लोक आहोत , दोन चार शब्द बोलून आमचे भागत नाही। आम्ही एकमेकांना भेटल्यावर किमान पंधरा वीस मिनिटे तरी बोलतोच्।
मला कल्पना आहे।
कसे काय ?
न्यूयॉर्क च्या मेडिसन स्क्वायर ला तब्बल सत्तर मिनिटे बोललात तुम्ही। मेडिसन स्क्वायर चे मोदीसन स्क्वायर करून टाकले हो तुम्ही।
अहो ते तर किरकोळ आहे ,आमच्याकडील निवडणुकात या एकदा। एका एका सभेत सर्व नेते मिळून अर्धा दिवस बोलत असतात। आहात कुठ ?
माय गॉड ! एवढे काय बोलता हो ? आमच्याकडे बघा। फार तर दहा पंधरा मिनिटे। अगदी मोजकेच।
बरोबर आहे ! तुमच्याकडे मोजकेच समस्या असल्याने मोजकेच बोलतात , आमच्यकडे असंख्य समस्या असल्याने अखंड बोलत राहतो आम्ही।
समस्या आमच्यापुढे ही आहेत , पण आम्ही सो कॉल्ड महाशक्ती असल्याने उघडपणे वाच्यता करता येत नाही हो।
कसली समस्या ?
दहशतवाद ! इसिस चा क्रूर दहशतवाद , त्याच्या विस्ताराची भीति। कुठे मांडावी आम्ही ? तुमच्याशी मात्र मनमोकळे बोलावेसे वाटले।
का ?
महाशक्ती आम्ही असलो तरी तुमच्या शक्ति ची झलक आम्हाला मिळाली आहे हं !
ठावुक आहे ! म्हणूनच तर तुम्ही मला इथे येण्याचे निमंत्रण दिले आहे। अगोदर वीसा नाकारला आणि आता रेड कारपेट चक्क। मला कळत नाही होय याचा अर्थ ?
विसरा ना आता तो कटु भूतकाळ ! आपण साथ साथ पावले टाकून भविष्याकडे लक्ष केंद्रित करुया ना !
नमो मंदस्मित करतात , बाजूला ठेवलेला एक ग्रंथ हातात घेतात आणि ओबामांच्या हातात सोपवतात।
' हा घ्या ! वाचा म्हणजे तुम्हाला साऱ्या प्रश्नांची उत्तरे यात सापडतील।
हे काय ?
गीता ! अर्जुन रणभूमीवर गोंधळल्यानंतर भगवान ' श्री कृष्णाने ' केलेले मार्गदर्शन , उपदेश म्हणजे गीता। गीता सार ' .
व्वा ! आपणच आमच्यासाठी श्रीकृष्ण आहात , आणि मला सांगा मी हे एवढे केव्हा वाचू ? वेळ कुठे आहे एवढा मला ? आपणच मार्गदर्शन करावे श्रीकृष्णाप्रमाणे।
हं ! तुम्ही खरे अर्जुन आहात। सर्वश्रेष्ठ धनुर्धर , जगभरात ज्याला तोड़ नाही , महावीर। पण आज ही अवस्था। रणांगणावर हातपाय गळाले आहेत , अवसान गेले आहे , काय अवस्था करून घेतली आहे ही अर्जुनासारखी ?
म्हणूनच तर म्हणतो आहे होऊन जाऊ दया !
म्हणजे ?
म्हणजे उपदेश करा भगवान। ' असे म्हणत ते गूढ़घ्यावर बसले ,दोन्ही हात जोडलेले। सारा प्रकार पाहुन नमो च्या चेहऱ्यावर हसु झळकले। ' व्वा ! काय परफेक्ट पोज़ घेतली आहे , अगदी महाभारतातल्या अर्जुनासारखी। वा ! आम्ही प्रसन्न झालो।
' वेळ न दवडता उपदेश करा भगवान।
' ते तर माझ्या आवडीचे काम आहे।
' यदा यदां ही अधर्मस्य ,
ग्लानिर्भवति भारत ............. !
हे काय ? मला समजेल अशा भाषेत सांगा भगवान , पहा त्या ' इंटरप्रेटर ' ला ही भोवळ आली आहे ही भाषा ऐकुन। हिंदी शिकता शिकता पुरेवाट लागते आहे , गुजराती काम चलावु शिकलो , आता हे काय नवीन ?
याला संस्कृत भाषा म्हणतात , सर्व भाषांची जननी।
सोप्या भाषेत सांगा भगवंत।
जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्माचे आक्रमण होते , तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीवर अवतार घेतो , अधर्म्यांचा नायनाट करण्यासाठी।
म्हणजे ? मी की तुम्ही ?
अशी जबाबदारीचा चेंडू माझ्या कोर्टात ढकलू नका हं।
हे पण गीतेत लिहिले आहे ?
नाही , हे माझे उपदेश आहेत।
पण मी की तुम्ही याचे उत्तर नाही दिलेत।
अहो , आपण दोघेही धर्माच्या बाजूने आहोत आणि अधर्म्यांचा नाश करायचा आहे ना ? आपण केवळ निमित्त्यमात्र आहोत , करता करवीता तो परमेश्वर आहे।
खरच ? अधर्माचे संकट जेव्हा उदभवते तेव्हा युगपुरुष जन्म घेतो असेच ना ?
व्वा ! तुम्हाला गीता रहस्य लवकर कळेल हं। शत्रूची ताकत फार मोठी आहे , पण धर्म आपल्या बाजूने आहे। तेव्हा निश्चिंत रहा , विजय आपलाच होणार यात शंका नाही। तेव्हा वत्सा , रणांगणावर असे हातपाय गाळु नकोस। उठ , आणि उचल तो गांडीव धनुष्य आणि कर आक्रमण।
धन्य झालो भगवन ! माझ्या अंगात वीरश्री चा संचार होतो आहे , आपल्या दोनचार वाक्याच्या उपदेशाने माझे बाहु फुरफुरु लागले आहेत।
बघ , दोनचार वाक्यांचा हा परिणाम , मी तास दोन तास बोललो तर काय अवस्था होईल तुझी ?
भगवान , माग मी युगपुरुष न राहाता तुमचा कार्यकर्ता होईल ! यामुळेच आपला प्रचंड बहुमताने विजय मिळवू शकलात।
खिल्ली उडवताय माझी ?
छे छे भगवन ! असेच दोन दोन तास आपले वचनामृत ऐकल्यावर कार्यकर्त्यात वीरश्री संचारली नसेल तरच नवल। आपल्या राजकीय शत्रूंचा धुव्वा उडवला तो याचमुळे।
लवकर कळले तुम्हाला।
एवढा आत्मविश्वास , एवढा कणखरपणा तुमच्यात कसा येतो भगवंता ?
याचे सीक्रेट आहे उपवास , उपोषण , अन्नत्याग ! यानेच मला आत्मविश्वास येतो , मन कणखर बनते। आपण आपल्या शरीराला त्रास दिला ना की आपण कणखर बनतो।
------ आणि इतरांना त्रास देतो असेच ना ?
चूक , एकदम चूक ! आपण कणखर बनलो की आपण सत्याच्या बाजूला ठामपणे उभे रहातो , अन्यायाशी खंबीरपणे लढतो। उदाहरणार्थ ' बापू , अण्णा या सर्वांनीच हा मार्ग निवडला आणि अख्ख्या विश्वात प्रसिद्धी मिळवली। त्यांच्यामुळे उपोषण आणि उपवासाचे ब्रैंडिंग झाले। ठावुक आहे ना ?
' पटले ! बापु , अण्णा आणि आता तुम्ही ! तुम्हा तिघांनी उपवासाने जी आत्मशक्ति निर्माण कली त्याने अख्खे विश्व काबिज केले। धन्य झालो हं आपल्याला भेटून। ' गीतेचे मर्म शिकवल्याबद्दल आभारी आहे। आता आत्मबल वाढवण्यासाठी मी पण केवळ पाणी पिणार।
पण शुद्ध पाणी , काहीही ' मिक्स ' न करता।
कळले भगवन ! प्रणाम करतो।
' यशस्वी भव ' ! आवजो इंडिया मा ! ' आमंत्रण देवून नमो अंतर्धान पावतात। ओबामा भारवलेल्या अवस्थेत त्यांच्या पाठमोर्या आकृतिकड़े टक लावून बघत राहतात। आपसूकच तोंडातून दोन शब्द निघतात " जय श्रीकृष्ण ".