ट्रक ड्रायव्हरचे आयुष्य डोळ्यांसमोर आले तर मन खिन्न होते. कित्येक दिवस कुटुंबापासून दूर राहणारे, दिवसरात्र ड्रायव्हिंग करणारे, भीषण अपघाताचा कायम धोका असलेले, तुटपुंज्या कमाईत दिवस काढणारे अशा या ड्रायव्हरचा विचार केला तर निश्चितच
आपण सुखी आहोत अशी सुखाची लकेर मनात उमटते. पण याच ट्रकवर मागच्या बाजूला लिहिलेला एखादा फनी संदेश आपल्याला खळखळून हसवून जातो. दिवसभराच्या कामाच्या रपाट्यात अवजड झालेले मन रिफ्रेश होते, हलके होते.