आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Question Paper On Maharashtra Vidhan Sabha Election

FUNNY - विधानसभेसाठी FACEBOOK वर शेअर करण्यात आलेली प्रश्न पत्रिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखिल भारतीय राजकीय आणि अराजकीय संघ
विषय : मराठी गुण : १००
वेळ : ३ तास
------------------------------------------------
प्रश्न १)खालील पैकी कोणत्याही एका विषयावर ४० ते ४५ ओळीत निबंध लिहा. (२० गुण)
१) मी आमदार झालो तर !
२) बंडखोर उमेदवाराचे आत्मवृत्त !
३) चिकनसुप शाप कि वरदान !
४) 'आप' कुणाची गरज ?
५) माझा आदर्श नेता !
प्रश्न २) रिकाम्या जागा भरा (६ गुण)
१. मी काय ..........मुतू
२. अब ........सरकार
३. हे सर्व........ धोरणामुळ
प्रश्न ३) कोण कोणास म्हणाले? (८ गुण)
१. "मग मी काय धरणात मुतू का?"
२. "मी त्यांना चिकन सुप पाजलंय"
३. "शाई पुसुन दोनदा मतदान करा"
४. "मी तर ८ कोटी खर्च केलाय निवडून येण्यासाठी"
प्रश्न ४) योग्य जोड्या जुळवा (८ गुण)
१. कलमाडी अ. सिंचन घोटाळा
२. अजित पवार ब. CWG घोटाळा
३. छगन क. आदर्श घोटाळा
४. चव्हाण ड. स्टँप घोटाळा.
प्रश्न ५) चुक की बरोबर सांगा (१० गुण)
१. गोध्रा हत्याकांडात मोदींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
२. 'आप'ने दिल्ली खुर्ची सोडण्याआधी
जनमतc घेतले होते.
३. महाराष्ट्रातील रस्ते गुजरातपेक्षा
चांगले आहे .
४. शिवबंधनामुळे बंडखोरी थांबली.
५. मनमोहनसिंग उत्स्फुर्तपणे बोलले.
प्रश्न ६) कोणत्याही २ वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (१० गुण)
१. एखाद्याचा भुजबळ करणे.
२. 'मनसे' पाठींबा देणे.
३. फक्त ४९ दिवस सोसणे.
प्रश्न ७) गटात न बसणारा शब्द ओळखा (८ गुण)
१. कमळ, वाघ, शिट्टी, रेल्वे इंजिन.
२. दादा, साहेब, ताई, आण्णा.
३. कॉंग्रेस, आप, भ्रष्टाचार, राष्ट्रवादी.
४. द्रविड, बोस, गांधी, खन्ना.
प्रश्न ८) पत्र लेखन (१० गुण)
"पक्षप्रमुखांनी तिकीट कापल्याने नाराज झालेल्या मामाची समजूत काढणारे पत्र लिहा."
प्रश्न ९) कोणत्याही ४ टीपा द्या. (२० गुण)
१. रामदास आठवलेचे "दिवा स्वप्न"
२. नाशिकचे पानीपत.
३. अशोक चव्हाण- आदर्श खासदार.
४. बटाटे वडा-चिकन सूप.
५. मोदी- मुख्यमंत्री ते पंतप्रधान.