आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MODI केजरीवाल आणि शरीफांवरील या कार्टून्सची सोशल साईट्सवर धूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या सरकारचा शपथविधी झाला, मंत्र्यांनी आपले कामकाज सांभाळले आणि कामाला सुरुवातही झाली. पाकिस्ताननेही चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत सोशल नेटवर्किंग साईट्सवर मात्र केजरीवाल, शरीफ आणि मोदींच्या विरोधकांना चिमटे घेण्याचा एककलमी कार्यक्रम नेटिझन्स राबवत आहेत. याठिकाणी मात्र केजरीवाल यांनी मोदींवर आघाडी घेतली आहे. कार्टून्सच्या माध्यमातून केजरीवालांबाबत अगदी परखडपणे आपले मत या कलाकारांना मांडले आहेत.
... ट्वीटद्वारेही घेतले चिमटे

Nitesh Mishra ‏@niteshmishra_
आरोग्यमंत्री म्हणून डॉ. हर्षवर्धन यांचे पहिले काम केजरीवाल यांच्या खोकल्यावर उपचार हेच असणार.!!"
Pratik Prajapati ‏@DrPratik
आता आमचे पंतप्रधान जेव्हा इतर नेत्यांना मिळतात, तेव्हा ते भावहीन वाटत नाहीत.
Anil Nindawat ‏@anilnindawat
-राहुल बाबा पुन्हा पुन्हा विचारत आहेत, अंकल अमेठीत तर मी जिंकलो मग स्मृती यांनी शपथ का घेतली?
- मी अरविंद केजरीवाल ईश्वरसाक्षीने शपथ घेतो की, मी राजकारणात कायम यू टर्न घेत राहील.
- मी रॉबर्ट वढेरा ईश्वरसाक्षीने शपथ घेतो की, मी काँग्रेसच्या मदतीने रिअल इस्टेटचा उद्योग असाच वाढवत राहील.
- मी प्रियंका गांधी ईश्वरसाक्षीने शपथ घेते की, स्मृती इरानी कोण आहे, असे भविष्यात पुन्हा विचारणार नाही.
- नवाज शरीफ आपल्या मुलीला सोबत घेऊन आले असते, तर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले असते.

विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले काही कार्टून्स साभार... पाहा पुढील स्लाईड्सवर