आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HAIR CUT आणि शेविंगचा FUNNY अंदाज...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियमितपणे ज्या व्यावसायिकांशी आपला संबंध येतो त्यामधील एक म्हणजे न्हावी. अनेकदा आपल्याला न्हाव्याकडे असलेल्या गर्दीमुळे ताटकळत बसावं लागत. न्हाव्याक्डे जाण्यात एक फायदा म्हणजे त्याठिकाणी विविध मुद्यांवर चर्चा सुरु असते आणि या चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या असतात. जास्त बडबड करणाऱ्या लोकांसाठी न्हाव्याच दुकान एक उत्तम स्थान ठरते.
तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की आज आम्ही न्हाव्याच्या दुकानासंदर्भात चर्चा का करत आहोत? तर त्यामागचे कारण असे आहे की निवडणुकीच्या धामधुमीत हीच अशी जागा आहे, ज्या ठिकाणी ह्यावेळेस कोणाची हवा आहे, कोण येणार, कोणी किती पैसे वाटले अशी सगळी ईत्थंभूत माहीती मिळते.
राजकारणी आणि न्हावी लहानपणी एकत्र गोट्या खेळत असावेत अशा थाटात एखादा न्हावी त्या नेत्याबद्दल बोलत असतो. नेत्याच्या किती 'भानगडी' आपल्याला माहीत आहे असं सांगतांना त्याचा चेहरा बघावा. कौन बनेगा करोडपती आणि ऑस्कर जिंकल्यासारखा आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. असो, तुम्ही पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा HAIR CUT आणि शेविंगचा FUNNY अंदाज...