आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIG HIT: 2020 मध्ये पिझाहटला फोन केल्यानंतर असे काही होईल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पप्पूने पिझा हटमध्ये फोन केला
सेल्समॅन- पिझा हट, नमस्कार !
ग्राहक पप्पू- हॅलो, तुम्ही माझ्या घरी पिझा पाठवून द्या ।
सेल्समॅन- सर, पहिले तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर सांगा.
पप्पू- ठीक आहे... माझा नंबर ********* - *********** - ******* हा आहे।
सेल्स मॅन- ओके... तुम्ही आहात ... श्रीमान राजू आणि तुम्ही हाउस नबंर 3**5, कैलासपुरी, चेन्नई येथून बोलत आहात. तुमच्या घरचा फ़ोन नंबर ********* आणि कार्यालयाचा नंबर ******** हा आहे. आणि तुमचा मोबाइलचा नंबर ********** हा आहे. तुम्ही तुमच्या घरच्या नंबरवरुन कॉल केला आहे.
पप्पू चकित होवून- तुम्हाला माझे एवढे सगळे फोन नंबर्स कसे मिळाले?
सेल्समॅन- आम्ही आधार सिस्टिमशी जोडलेलो आहोत.
पप्पू- मला डबल मोजरेला पिझा ऑर्डर करायचा आहे.
सेल्समॅन- तुमच्यासाठी हा चांगला विचार नाही सर !
पप्पू- असे का ?
सेल्समॅन- तुमच्या मेडिकल रेकॉर्डनुसार, तुम्ही उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल या आजारांनी पीडित आहात सर !
पप्पू- मग काय ? तुम्ही मला काय सल्ला द्याल की मी कशाची ऑर्डर देऊ?
सेलमॅन- आमचा कमी चिकनाई असणारा होक्किन पिझा ऑर्डर करा, तुम्हाला तो फार आवडेल ।
पप्पू- तुम्ही हे कसे सांगु शकता की, तो मला आवडेल म्हणून ?
सेल्समॅन- मागच्या आठवड्यात तुम्ही नॅशनल लायब्ररीमधून 'लोकप्रिय होक्किन व्यंजन' नावाचे पुस्तक विकत घेतले होते.
पप्पू- सोडा हेच ठीक आहे... मला 3 मोठ्या आकाराचे पाठवून द्या
सेल्समॅन- तुम्ही बरोबर सांगत आहात, तुमच्या घरातील 7 सदस्यांसाठी 3 मोठे पुरेसे आहेत सर ! याचे एकूण बील 2100 रुपये झाले.
पप्पू- मी याचे बील क्रेडिट कार्डने करुन टाकेल।
सेल्समॅन- तुम्हाला यासाठी कॅश पेमेट करावे लागेल सर ! तुमच्या क्रेडिट कार्डची सीमा संंपली आहे आणि तुम्हाला बॅँकेला 168745 रुपये देणे बाकी आहेत. यामध्ये मागील वर्षातील जुलै महिन्याचे होम लोन आणि त्यावरील उशीरा पैसे भरल्यामुळे लागलेला अतिरिक्त चार्ज आहे.
पप्पू- मी बाजूच्या एटीएममधूम पैसे काढून ठेवेल तुमचा माणूस येण्या आधी !
सेलमॅन- तुम्ही असे नाही करु शकत, तुम्ही तुमची ओव्हरड्राफ्ट सीमा समाप्त केली आहे ।
पप्पू- काही विशेष नाही, मी पैशांची सोय करुन ठेवेल, पिझा कधीपर्यंत येईल ?
सेल्समॅन- अदाजे 45 मिनटे सर ! पण जर तुम्ही वाट बघू शकणार नसाल तर, तुम्ही तुमच्या मोटर सायकलवर येवून घेवू शकता ।
पप्पू- काय?
सेल्समॅन- सिस्टिमच्या विवरणानुसार, तुमच्या मोटरसायकल नंबर **** चे मालक आहात
पप्पू- ?? या लोकांना माझ्या गाडीचा नंबर देखील माहिती आहे!
सेल्समॅन- तुम्हाला आणखी काही हवे आहे का सर?
पप्पू- काही नाही! तुम्ही मला कोलाच्या 3 मुफ़्त बाटल्या देत आहात ना? ज्याची तुम्ही जाहिरात केली आहे ?
सेल्समॅन- आम्ही तुम्हाला दिली असती सर, परंतु, तुम्हाला मधूमेह आहे त्यामुळे देता येणे शक्य नाही.
पप्पू- तुझ्या तर…
सेल्समॅन- तुमच्या शब्दांवर मर्यादा ठेवा सर, 10 जुलै 1986 रोजी एका पोलिसाला शिव्या दिल्यामुळे तुम्हाला 3 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते आणि 500 रुपये दंड भरावा लागला होता.
ग्राहक पप्पू बेशुद्ध...
आणखी तयार करा आधार कार्ड.....