कपिल.. कपिल आणि फक्त कपिल... कपिल जे काही करेल थे थोडेच आहे कारण त्याच्याकडून अजूनच जास्त अपेक्षा आहेत. कपिल आपल्या चेहर्यावरील हावभाव, त्याची परफेक्ट टायमिंग, शब्दफेक यामुळे त्याचा शो पाहताना एका मिनिटाकरिताही शांत बसणे होत नाही. कोणी कितीही टेन्शनमध्ये असो.. कपिल समोर आला की, टेन्शन गया पेन्शन लेने असेच होऊन जाते. त्याचे जोक्स आता तर लहान मुलांच्याही तोंडात रेंगाळतात. त्याच्या या शोमधील त्याचे अस्तित्व त्याचा प्रेझेंस इतका महत्त्वाचा आहे की, बॉलिवड सुपरस्टारही आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी त्या शोच्या प्रतिक्षेत असतात. खुद्द बॉलिवूड शहेनशहा
अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख, सल्लू मिया यांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. केवळ भारतातच नव्हे जगभरात कपिलचे दिवाने पाहायला मिळतील... आज या नागपंचमीच्या दिवशी असेच काही कपिलचे खदखदून हासवणारे जोक्स Divyamarathi.com खास तुमच्यासाठी घेऊन आलाय.