हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 14 सष्टेंबरला देशभर हिंदी दिवस साजरा केला जातो. मात्र भारतीयांवर इंग्रजीचा प्रभाव असल्यामुळे अनेक लोकांना ना चांगली हिंदी येते ना इंग्रजी भाषा बोलता येते.
इंग्रजी बोलण्याची इच्छा मात्र प्रत्येकाला असते. काही लोक तर हिंदी इग्रजीचे कॉम्बीनशन करून दुकानावर इंग्रजी मिश्रीत हिंदीच्या पाट्या लावतात. अशा प्रकारची हिंदी पाहून चांगल्या हिंदी जाणकाराला राग आल्याशिवाय राहात नाही. काही वेळेस यामधून विनोदही निर्माण होतात. हिंदी दिवसाच्या निमित्ताने आज आम्ही काही हिंदी संदेश संकलीत केले आहेत. हे पाहिल्यानंतर तुम्हाला हासू आल्याशिवाय राहणार नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, हिंदी भाषेची कशा होते थट्टा..