आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किल'बिल' किल'बिल' पक्षी बोलती....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिल गेट्‍स म्हणे पक्ष्यांना फार घाबरतो, मला हे खरं वाटत नव्हतं म्हणून मी छडा लावायचा प्रयत्न केला आण ते खरं निघालं. त्याचं काय झालं की एकदा बिल गेट्‍स महाराष्‍ट्राच्या दौर्‍यावर आला. इथल्या शाळेतील संगणक शिक्षणात काय प्रगती झाली हे त्याला बघायचे होते. पण आपला गाईडही हुशार होता, त्याने त्याला शाळेतील स्नेहसंमेलन बघायची विनंती केली आणि तो तयार झाला. 'मुलांनी किलबिल किलबिल पक्षी बोलती' या गाण्‍यावर नृत्य करावयास प्रारंभ केला आणि इथेच घोटाळा झाला. इथले पक्षी 'बिल' ला 'किल' करायची आज्ञा देतात हे बघून त्याने पक्ष्यांचा धसकाच घेतला. म्हणून तेव्हापासून बिल गेट्‍स पक्ष्यांना फार घाबरतो.