आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडंबन - मोदी गुरूजी आणि " शिक्षक दिन " वर्गात बसले इतर पक्षांचे नेते मंडळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाग - १
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव करून मोदी गुरुजींनी देशभरातील महागुरूंना क्षणार्धात् केविलवाणे' ढ 'विद्यार्थी करून टाकले , त्यात शिक्षक दिनी ' मोदी गुरूजी 'क्लास ' घेणार म्हटल्यावर तथाकथित 'ढ ' विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली। आज कुणीही मिडिया वाल्यांना बातम्या पुरवायच्या नाहीत , बाईट द्यायचे नाहीत , वादग्रस्त विधाने करावयाची नाहीत ,की भाषण नाही असा अघोषित नियमच करून टाकला। फ़क्त मोदी गुरुजींचा क्लास अटेंड करायचा हा एकच ध्यास मनात ठेवून सर्वांची धावपळ सुरु। सारे पडेल नेते आपल्या मानलेल्या' आई 'ला , म्हणजेच हायकमांड च्या मागे लागलेत , टाय बांधून दे , रुमाल कुठे आहे , सॉक्स कुठे ठेवलेत , बुटांना पॉलिश नाही , एक ना अनेक तक्रारी करीत अखेरीस सारे तैयार झाले। पृथ्वीराजबाबा , नारायण राव , आर आबा , अजित दादा , छगनराव , शरदराव , सारे सारे कसे अगदी डोळ्यात काजळ वगैरे घालून अपटूडेट झाले।
' येवू दे आता मोदी सरांना , नाही नाही ते प्रश्न विचारुन भांडवून सोडेन त्यांना। येवूच दे ! असे दात ओठ खात अजित दादा पुटपुटले तसे काकांनी ' डोळे ' मोठे ' करून असे काहीही न करण्याची खुण केली।
असे जाहीरपणे बोलू नये ! भविष्यात काय वाढून ठेवले आहे , माहित आहे का आपल्याला ? त्यांच्या बरोबर जावे लागले तर ? अशी रास्त आणि अनाहूत भीती काकांनी व्यक्त केली तसे ' दादा ' शांत झाले।
' हेच हेच ! याच अनिश्चित धोरणाने आपली वाताहत झाली साहेब ! बिना गारंटी चे घड्याळ म्हणतात आपल्याला। मेड इन 'यूएसए ' , उल्हासनगर ब्रैंड। छगनरावांचा क्रोधाने तोल गेला।
त्यांना पराभव अजूनही पचवता आला नाही हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते। डोक्यावरचे केस खोटे असले तरीही रागाने ताठ उभे राहिले एवढा त्यांना राग आला होता।
' छगनराव , शांत राहा , झाले गेले विसरून जा ' आर आर आबा समजावनी च्या भूमिकेतून बोलले। बड़े बड़े निवडणुका में छोटे छोटे पराभव होते रहते है ! '
हा पराभव छोटा होता ? मी छोटा आहे का ? छगनराव जाम चिडले
'तुम्ही नाही हो छोटे , तुमच्याविरुद्ध जो उमेदवार होता ना , तो छोटा। म्हणून मी म्हणालो छोटा पराभव। ' अजित दादांनी बाजु सांभाळून घेतली तसे आबांनी सुस्कारा सोडला। ' अजितदादा देवासारखे धावून आलात हं। असा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर आला।
' हं , माझ्या नादी लागू नका , सांगून ठेवतो ! ' छगनराव कडाडले।
' कोण लागणार तुमच्या नादी , तुमच्या नावातच ' गन ' आहे। सुरुवातीचे अक्षर ' छ ' काढून टाकला की शेवटी केवळ ' गन ' उरते। तीही ' एके - ५६ ' सारखी गन '
' . पीजे ' असला तरी वातावरण हलके फुलके करण्यासाठी पुरेसा होता। सारेच जण खळाळून हसले आणि वातावरण ' नाड़ा ' सुटलेल्या पायजाम्याप्रमाणे ' सैल ' झाले आणि आपली जागा सोडली।
चला चला ! वेळ झाली आहे ' नमो ' गुरुजींच्या क्लास ची वेळ झाली आहे। शिक्षक झाले आहेत ते शिक्षक दिनी। आज आपणही त्यांच्या कडून काही महत्वाच्या गोष्टी शिकुन घेवू या। चला चला ! शरद काकांनी फरमान सोडले आणि सारेजण हॉल ' मधील प्रोजेक्टर ' समोर येवून बसले।
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा भाग 2....