फेसबुकर्सना काही वर्षांपूर्वी कसूभरही कल्पना नसेल की, भविष्यात त्यांचे एक काम एवढे वाढेल जे त्यांना नित्य नियमाने दररोज करावेच लागेल. हे काम म्हणजे फेसबुक नियमित अपडेट ठेवणे, आपले स्टेटस चेक करणे आणि लाईक्स आणि कमेंट किती मिळालेत आपल्या स्टेटसला हे चेक करणे. आज हे काम काही जणांचे दररोजचा कार्यक्रमच झाला आहे. हे काम केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. काही लोक फेसबुकवर ज्ञान वाटत फिरत असतात, तर दुसरीकडे काही लोक इतरांना हसवण्याच्या युक्त्या शोधत असतात. यांचे काम केवळ हसणे आणि हसवणे एवढेच असते. ते जास्त तत्वज्ञान विज्ञानाच्या भानगडीत पडत नाहीत. अशाच काही कलंदरांचे मस्त मस्त पोस्ट खास तुमच्यासाठी... पाहा आणि खळखळून हसा...