पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सामाजिक जिवनाची सुरवात आयपीएस अधिकारी अशी करताना त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले होते. कोणत्याही प्रकारच्या दडपणाला भीक घातली नव्हती. देशाच्या माजी पंतप्रधानांची नोपार्कींगमधील गाडी उडलण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. यामुळे लगेच त्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रसिद्ध झाल्या. पण काही कारणास्तव त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर सामाजिक कार्यात रुळल्या. यावेळी त्यांच्या आयुष्यात तोच तो पणा आला होता. पण या दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली. किरण बेदी पुन्हा घराघरा पोहोचल्या. गेल्या काही वर्षांपासून त्या हजारे यांच्या विश्वासू होत्या. पण अखेर भाजपमध्ये प्रवेश करुन त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सोशल मीडियावर अशा प्रकारे क्रिएटिव्ह तयार करुन किरण बेदी यांची खिल्ली उडवली जात आहे...