Home »International »Other Country» सुमारे 80 हजार अवकाश यात्रींना राहता येईल, अशी या शहराची रचना राहणार आहे.

मंगळावर छोट्याशा शहराचे स्‍वप्‍न, फक्त शाकाहारींनाच आमंत्रण मिळणार

वृत्तसंस्‍था | Jan 07, 2013, 20:04 PM IST

  • मंगळावर छोट्याशा शहराचे स्‍वप्‍न, फक्त शाकाहारींनाच आमंत्रण मिळणार

लंडन- प्रसिद्ध उद्योगपती व 'पे-पाल'चे सहसंस्थापक एलॉन मस्क हे मंगळ ग्रहावर एक छोटे शहर विकसित करण्‍याची योजना आखत आहेत. सुमारे 80 हजार अवकाश यात्रींना राहता येईल, अशी या शहराची रचना राहणार आहे. परंतु, तेथे जाण्‍यासाठी अट एकच, ती म्‍हणजे शाकाहारी असण्‍याची!

मस्‍क यांच्‍या 'फाल्‍कन 9' रॉकेटद्वारे अंतराळातील केंद्रात रसद पुरविण्‍यात येते. त्‍यांना या भविष्‍यातील शहराची कल्‍पना सुचली आहे. 'द सन' या वर्तमानपत्राने यासंदर्भात दिलेल्‍या वृत्तानुसार, स्‍वप्‍नातील या शहरामध्‍ये शाश्वत तंत्रज्ञानावर जगणे शक्‍य होणार आहे. तसेच तेथे शाकाहारी लोकांच्‍याच गरजा पूर्ण होतील. मस्‍क यांनी हे स्‍वप्‍न सांगण्‍यासाठी तब्‍बल 10 वर्षे प्रतिक्षा केली. ते म्‍हणाले, दहा वर्षांपूर्वी हे हास्यास्पद वाटत होते. कारण तेव्हा रॉकेट, मूलभूत सुविधा नव्हत्या. तसेच नासा ही अंतराळ क्षेत्रातील एकमेव संस्‍था होती. मंगळावर संशोधन करण्याचे नासाचेही त्‍यावेळी नियोजन नव्हते. परंतु, आता हे स्‍वप्‍न प्रत्‍यक्षात उतरेल, असे वाटत आहे. माझ्यासोबतच या क्षेत्रात काम करणा-यांमुळे हे स्‍वप्‍न पूर्ण होऊ शकते.

Next Article

Recommended