आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • bangladesh army foils attempt to topple government

बांगलादेशात सत्तांतराचा कट उघड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- सत्तारूढ सरकारविरोधात बंड करण्‍याची हवा आता पाकिस्‍तानातून बांगलादेशमध्‍ये पोहोचली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्‍याच्‍या लष्‍करातील असंतूष्‍ठ गटाचा पर्दाफाश केल्‍याचा दावा बांगलादेशाच्‍या लष्‍कराने केला आहे. लष्‍कराने याप्रकरणी दोन माजी अधिका-यांना अटक केली असून एका फरारी आरोपाचा शोध सुरू आहे. तर अन्‍य 16 जणांवर लष्‍कर लक्ष ठेऊन आहे.

बांगलादेश लष्‍कराचे प्रवक्‍ता ब्रिगेडिअर जनरल मो. मसूद रज्जाक यांनी गुरूवारी अचानक बोलावलेल्‍या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्‍या सरकारला पाडण्‍याचा लष्‍कराचा डाव होता. यामध्‍ये लष्‍कराचे अनेक वरिष्‍ठ अधिकारीही सामील होते, असे त्‍यांनी सांगितले.

कट्टरपंथी विचारधारेच्‍या लष्‍करातील लोकांनी परदेशात स्थिर झालेल्‍या काही माजी अधिका-यांना हाताशी घेऊन शेख हसीना यांचे सरकार उलथवण्‍याचा डाव रचला होता, असे लष्‍कराचा दावा आहे. ताब्‍यात घेण्‍यात आलेल्‍या दोन माजी अधिका-यांनी हा कट रचल्‍याचे कबूल केले आहे.
भारत-बांगलादेश हितसंबंधांवर चीन गुंतवणुकीचा परिणाम नाही
बांगलादेश लष्करातील बंडखोर ६५७ जवानांना तुरुंगवास