आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : कोणी कसे प्रेम व्यक्त करील याचा काही नेम नाही!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील इसाक लॅम्बने आपली मैत्रिण एमी फ्रेंकेलपुढे विवाहाचा प्रस्ताव अशा प्रकारे ठेवला की या व्हिडिओने सा-या जगाला भूरळ घातली आहे. २५ मे ला यू ट्युबवर प्रसारित केलेला हा व्हिडिओ सध्या तुफान पाहायला जात आहे. या जगात प्रेमासारखं ग्रेट काहीच नसतं. तरी मंगेश पाडगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. तरीही हे प्रेम व्यक्त करणाच्या पद्धती, प्रकार हे जगभर वेगवेगळे आहे. आपल्या मैत्रिणाला लग्नाची मागणी घालण्यासाठी इसाक नावाच्या व्यक्तींने वेगळीच आयडिया लढवली.
नृत्य आणि मधुर संगीत लावले आहे. त्यानंतर इसाकने एमीला आपल्या कारच्या मागील बाजूला बसवले आहे. तसेच तिच्या कानाच हेडफोन दिला आहे. त्यानंतर कार सुरु होते. कार सुरु झाल्यानंतर एमीच्या घरातील लोक व नातेवाईक एक-एक या व्हिडिओत तिला दिसायला लागतात. या मित्राची व परिवारातील सदस्यांची संख्या अखेर ६० वर जाते. मग हळूच नाचत व गाणे गात इसाक एमीला हा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती करतो. व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात इसाक काळ्या रंगाच्या एका भारदार ड्रेसमध्ये आपली मैत्रिण एमीला लग्नाचा प्रस्ताव देतो व एमी त्याला चुंबन देत होकार देते. पाहा हा मजेदार व तेवढाच भावनिक व्हिडिओ...