Home »International »Bhaskar Gyan» -No-Fertile-Men-In-50-Years-As-Sperm-Counts-Slide

40 वर्षांनी मानवी उत्पतीवर संकट; पुरुषांतील शुक्राणूत दिवसेंदिवस मोठी घट

वृत्तसंस्था | Apr 22, 2012, 12:57 PM IST

  • 40 वर्षांनी मानवी उत्पतीवर संकट; पुरुषांतील शुक्राणूत दिवसेंदिवस मोठी घट

मुंबई- पश्चिमेकडील देशांत दरवर्षी दोन टक्केप्रमाणे पुरुषांतील शुक्राणुंची संख्या कमी-कमी होत चालली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढील ४०-५० वर्षात पुरुषांना बाप होणे अवघड जाणार आहे.
भारतीय दिशादर्शनानुसार प्रजनन तंत्रावर काम करणारे डॉ. पी. एम. भार्गव यांच्या माहितीनुसार, ९० दशकाच्या मध्यात शुक्राणुच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. त्यानुसार डॉक्टरांचे म्हणणे आहे की, प्रजननाबाबत लवकरच कायदेशीर गोष्टी होताना दिसतील.
प्रजननासाठी सर्वात महत्त्वाचे घटक हा शुक्राणु तसेच स्पर्म काऊंट हा असतो. मात्र पुरुषांमधून तो दिवसेंदिवस कमी कमी होत चालला आहे. याची प्रमुख कारणे कामाचा वाढता तणाव, जाडपणा व प्रदुषित हवा ही आहेत. यामुळे शरीरावर मोठा परिणाम होत आहे. गेल्या वर्षात स्पर्म काऊंटमध्ये ५० टक्के घट झाली आहे. जर ही घट अशीच होत राहिली तर पुढील ४०-५० वर्षात मुलांना जन्म देण्याइतके पुरुषांच्या वीर्यात शुक्राणू नसतील. अशा स्थितीत मानवी उत्पतीबाबत नवे प्रश्न निर्माण होतील.
‘ऑब्झर्व्हर’ला फिल्टर नकोच; घटता जन्मदर गंभीर बाब
मानवी तस्करी रोखण्यासाठी सेल स्थापण्याचे हायकोर्टाचे आदेशNext Article

Recommended