आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमूकल्या जपानवर 1 क्वाड्रिलियन कर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानवरील कर्जाच्या आकड्याने नवा विक्रम स्थापन केला आहे. हा आकडा एवढा मोठा आहे की, संख्या वाचताना दमछाक होऊन डोके गरगरायला लागेल. जपानवरील कर्ज एक क्वाड्रिलियन येन म्हणजे
1, 000, 000, 000, 000, 000 येनपर्यंत पोहोचले आहे. ही रक्कम जपानी अर्थव्यवस्थेच्या दुपटीहून जास्त आहे.
रक्कम सांगण्यासाठी पहिल्यांदाच क्वाड्रिलियन शब्दाचा वापर करण्यात आल्याचे ब्लूमबर्ग वृत्तवाहिनीने म्हटले आहे. क्वाड्रिलियन म्हणजे काय? अशी वाहिनीकडे विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी उत्तर दिले, समजायला कठीण आहे, त्यामुळे सांगता येत नाही.


एक क्वाड्रिलियन म्हणजे
1,000,000,000,000,000 (15 शून्य)


क्वाड्रिलियनची उकल
1. मानवी शरीरात 100 ट्रिलियन पेशी आहेत. क्वाड्रिलियनपर्यंत पोहोचण्यासाठी दहा माणसाच्या पेशी एकत्र कराव्या लागतील.
2. वॉशिंग्टन पोस्ट खरेदी करणारे अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांच्यासारख्या 40 हजार व्यक्तींची मालमत्ता एकत्र करावी लागेल.
3. न झोपता एका सेकंदात एका अंकाची गणना केल्यास 310 लाख वर्षांमध्ये एक क्वाड्रिलियनपर्यंत पोहोचता
येईल.
4. एक हजार येनच्या नोटा एकावर एक ठेवल्यास 70 हजार मैल उंच टॉवर निर्माण होऊ शकेल.
आणि आपण कोठे ? : जपानवर एक क्वाड्रिलियन येन म्हणजे 630.6 लाख कोटी रुपये कर्ज आहे. दुसरीकडे भारतावर डिसेंबर 2012 मध्ये विदेशी कर्ज 22.57 लाख कोटी रुपये कर्ज होते. असे असले तरी अमेरिका जपानपेक्षाही पुढे आहे. अमेरिकेवर 960 लाख कोटी रुपये कर्ज आहे.