आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुरुंग नाही हा तर महाल, पाहिल तो म्हणेल मला तुरुंगात टाका !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारागृह, तुरुंग, जेल... म्हणजे काय, असे तुम्हाला कोणी विचारले तर, आपल्यासमोर एक चित्र उभे राहाते. काळ्या कळकटलेल्या दगडी भिंती. त्यात प्रामुख्याने दिसतो तो, क्रुर जेलर. तुरुंगातील भोजन, ही एक वेगळीच शिक्षा असल्याचे आपल्याला वाटते. तेथील भाजी आणि दाळ म्हणजे निव्वळ उकळलेले पाणी. भातामध्ये खडे आणि किडेही. आकार नसलेल्या चपात्या, या अर्ध कच्च्या असतात. गुरे-ढोरेही तोंड लावणार नाही असे हे अन्न. पण, ते देखील इतर कैदी हिसकावून घेतील ही भीती.

टीव्ही आणि हिंदी सिनेमा पाहाणा-यांना जेल म्हटल्यावर असेच चित्र समोर येणार. कारण आपल्या चित्रपटांतून कारागृहाचे चित्र असेच रेखाटण्यात आले आहे.

मात्र, सर्वच तुरुंग काही असे नसतात. जगात अनेक तुरुंग असे आहेत की, जे पाहिल्यानंतर तुरुंगाबद्दलची आपली कल्पनाच बदलून जाईल. तर, पाहूयात जगातील टॉप टेन जेल.