आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत 10 भारतीय फायनलमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील 2013 च्या प्रतिष्ठेच्या सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत भारतीय वंशाच्या 10 विद्यार्थ्यांची अंतिम 40 मध्ये निवड झाली आहे. उपांत्य फेरीतील 300 स्पर्धकांतून 40 जणांची निवड जाहीर झाली आहे.
इंटेलच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. ही परीक्षा 7 ते 13 मार्चदरम्यान होणार आहे. परीक्षेच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तिघे कॅलिफोर्नियातील आहेत. पौलोमी भट्टाचार्य (कुपेर्टिनो), पवन मेहरोत्रा (सिमी व्हॅली), सहाना वासुदेवन (पाओ ऑ ल्टो), नाओमी शाह (पोर्टलँड), राघव त्रिपाठी, सूर्या भूपतीराजू (लेक्सिंग्टन), निथान मुंडुकूर (लुईसिविली), अक्षय पद्मनाभ (कोलीरविले), राजा सेल्वाकुमार (अल्फारेट्टा), मयूरी श्रीधर (किंग्ज पार्क, न्यूयॉर्क)अशी त्यांची नावे आहेत.

देशातील 21 राज्यांतील एकूण 1700 विद्यार्थ्यांमधून अंतिम फेरीसाठी 40 तरुण संशोधकांची निवड झाली आहे. संशोधन क्षेत्रात स्त्री-पुरुषांना समान संधी उपलब्ध करून दिली जाते. अंतिम फेरीसाठी विद्यार्थ्यांचे वर्गीकरण 16 विषयांत करण्यात आले आहे.