आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PARIS : पैगंबराचे कार्टून छापणा-या साप्ताहिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला, 12 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - येथील एका साप्ताहिकाच्या कार्यालयावर काही अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक लोक यात जखमी झाल्याची माहितीही मिळत आहे. चार्ली हेबडो नावाच्या मासिकाच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला. यात एक पत्रकार ठार झाल्याची माहितीही मिळते आहे.
फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सुआ ओलांद घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी हा दहशतवादी हल्ला अशल्याचे म्हटले आहे. हा भ्याड हल्ला असून तो घडवणा-यांना लवकरच अटक करून कडक शिक्षा दिली जाईल असेही ओलांद म्हणाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार क्लाश्निकोव्ह रायफल असलेले हल्लेखोर साप्ताहिकाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी एकच अंधाधुंद गोळीबार सुरू केला.हल्ला करण्यात आला त्यावेळी हल्लेखोरांचे तोंड झाकलेले होते, अशी माहिती मिळत आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर दोन गाड्यांत पळून गेल्याचे समजत आहे.
2011 मध्ये मोहम्मद पैगंबरांचे कार्टून छापल्यानंतर हे साप्ताहिक प्रकाशझोतात आले होते. स्वतंत्र पत्रकारिता आणि मोकळेपणाने विचार मांडणारे हे साप्ताहिक चांगलेच प्रसिद्ध आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, हल्ल्यानंतरचे काही PHOTO