आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांभाळून... या एअरलाईन्‍समधुन प्रवास म्‍हणजे 'राम भरोसे'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- जगभरात सध्‍या प्रवासी विमान वाहतूक कंपन्‍यांमध्‍ये प्रचंड स्‍पर्धा दिसून येत आहे. प्रवाशांना आ‍कर्षित करण्‍यासाठी विमान वाहतूक क्षेत्रात भाडेयुद्ध सुरु झाल्‍याचेही चित्र दिसत आहे. परंतु, स्‍वस्‍त भाड्याच्‍या चक्‍करमध्‍ये अडकू नका. त्‍यापेक्षा सुरक्षिततेला महत्त्व द्या. सुरक्षिततेच्‍या बाबतीत भारताची एअर इंडिया जगात तिस-या क्रमांकाची असुरक्षित कंपनी आहे. तर चायना एअरलाईन्सचा प्रवास सर्वाधिक असुरक्षित आहे. त्‍यापाठोपाठ टॅम एअरलाईन्स आणि एअर इंडियाचा क्रमांक लागतो.

जगभरातील विमान अपघातांचा अभ्यास करणाऱ्या 'जेट एअरलाईन क्रॅश डेटा इव्हॅल्यूएशन सेंटर'ने जगभरातील 60 एअरलाईन्स कंपन्यांच्या सेवांचा सुरक्षिततेच्या अंगाने अभ्यास केला. या संकेतस्थळाने तयार केलेल्या यादीत एअर इंडियाचा 58 वा क्रमांक आहे.

फिन्नएअर जगातील सर्वांत सुरक्षित एअरलाईन्स असल्याचा दावा या संकेतस्थळाने केला आहे. त्यानंतर एअर न्यूझीलंड, कॅथी पॅसिफिक आणि अमिरातीस यांचा क्रमांक लागतो. गेल्या 30 वर्षांच्या कालावधीत वरील एकाही एअरलाइन्सची विमान दुर्घटना झालेली नसून कोणताही प्रवासी मृत्युमुखी पडलेला नाही.


पाहु या कोणत्‍या विमान वाहतूक कंपन्‍या सुरक्षित आहेत आणि कोणत्‍या असुरक्षित...