Home | International | China | 10 worker in mining china

चीनमध्ये खाणीत दहा मजूर अडकले

वृत्तसंस्था | Update - Sep 16, 2011, 11:14 PM IST

येथील उत्तर भागातील कोळसा खाणीत काम करणारे दहा मजूर पुरामुळे अडकले आहेत.

  • 10 worker in mining china

    बीजिंग - येथील उत्तर भागातील कोळसा खाणीत काम करणारे दहा मजूर पुरामुळे अडकले आहेत. शांघी प्रांतात ही घटना घडल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले. शुक्रवारी हे मजूर खाणीत असताना अचानक पुराचे पाणी आत शिरले. त्यामुळे मध्ये काम करणारे मजूर अडकले असून त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आज दुपारी हा पूर आल्याने शानयिन भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, खाणीत अडकलेल्यांना काढण्यासाठी मदत कार्य सुरू झाले आहे.

Trending