आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाचा तनिष्क 10 व्या वर्षीच पदवीधर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस- सामान्य मुलांच्या तुलनेत अफाट बुद्धिमत्ता लाभलेला भारतीय वंशाचा तनिष्क अब्राहम याने वयाच्या दहाव्या वर्षीच अमेरिकेतील महाविद्यालयातून नुकतीच पदवी संपादन केली आहे. याबरोबरच अमेरिकेतील तो सर्वात लहान पदवीधर ठरला आहे. कॅलिफोर्नियातील रहिवासी असलेल्या तनिष्कने उच्च माध्यमिक शाळेतील डिप्लोमा करत ग्रॅज्युएट होण्याचा मान मिळवला आहे. मार्च महिन्यात त्याने पदवीची परीक्षा देण्यासाठी तो पात्र असल्याचे एका परीक्षेद्वारे सिद्ध केले होते. हे आव्हान पेलताना अतिशय आनंद झाल्याचे तनिष्कने सांगितले.

राष्ट्राध्यक्ष बनण्याचे स्वप्न
असामान्य बुद्धय़ांकाची देणगी मिळालेल्या तनिष्कने सातव्या वर्षीच कम्युनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असून यापुढील शिक्षणही वेगाने पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे.
आईला भीती वाटायची..
शिशुवर्गात असतानाच तनिष्कच्या अचाट बुद्धिमत्तेबद्दल सर्वांना कळले. त्या वेळी तो दुसर्‍या-तिसर्‍या वर्गातील मुलांची पुस्तके वाचत असे. त्यामुळे त्याच्या वयाची मुले चिडवत असत. तनिष्क त्याच्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या मुलांसोबत कॉलेजमध्ये जाऊ लागला तेव्हा आई सुरुवातीला नाराज होती. पण तनिष्कची उत्तरोत्तर प्रगती पाहून त्यांची भीती हळूहळू कमी झाली.

ओबामांकडून अभिनंदन
तनिष्कने एवढय़ा लहान वयात पदवी संपादन केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याला अभिनंदनपर पत्र पाठवले. विशेष यश संपादन केल्याच्या आनंदात कुटुंबीय आणि मित्रांसह आपणही सहभागी असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.