आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 ख्रिश्चन परिचारिकांवर पाकिस्तानात विषप्रयोग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- कराची शहरातील एका हॉस्पिटलमधील 11 ख्रिश्चन परिचारिकांना विष पाजल्याचा दावा पाकिस्तान ख्रिश्चन पोस्टच्या वृत्तात करण्यात आला आहे. मुस्लिमांच्य पवित्र रमजान महिन्यामध्ये परिचारिकांनी सार्वजनिक ठिकाणी जेवण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्यांना ही शिक्षा दिल्याचे सांगण्यात येते.
11 परिचारिकांना कराची येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिका-याने पाकिस्तान ख्रिश्चन पोस्ट वेबसाइटच्या वृत्तावर टिप्पणी करण्यास नकार दिला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
तिघींची प्रकृती गंभीर : 11 पैकी तीन परिचारिकांची प्रकृती गंभीर असल्याचे हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले. यातील एक परिचारिका धोकादायक स्थितीत असून अन्य नऊ जणींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. हॉस्पिटलमधील अधिकारी इरशाद अंजुम यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. परिचारिका चहा पित होत्या त्यानंतर अल्पावधित त्या बेशुद्ध पडल्या. चहामध्ये विष मिसळणा-या अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.

आठवडाभरात अहवाल
परिचारिकांच्या रक्ताचे नमुने व हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरातील काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तपास अहवाल आठवडाभरात येईल, असे अब्बासी म्हणाले. पाकिस्तान घटनेनुसार रमजान महिन्यात सार्वजनिक ठिकाणी जेवण करणा-याला शिक्षा दिली जाऊ शकते. या घटनेनंतर अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजामध्ये भीती निर्माण झाल्याचे पाकिस्तान ख्रिश्चन पोस्टने म्हटले आहे.