आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीवर ११ कोटीहून अधिक तळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - पृथ्वीवर एकूण किती तळे आहेत, या प्रश्नाचे उत्तर अखेरीस शास्त्रज्ञांना मिळाले असून ही संख्या सुमारे ११ कोटी ७० हजार आहेत. पृथ्वीवर ज्या भागात मानवी वस्ती नाही, त्या भागात बहुतांश तळे आहेत, अशी माहिती स्वीडनमधील उमेआ विद्यापीठातील पर्यावरण शास्त्रज्ञ डेव्हिड सीकेल यांनी दिली. या मोहिमेत प्रत्यक्ष तळ्यांची संख्या मोजण्यात आली नसून जमिनीचा आकार आणि क्षेत्रफळाद्वारे तळ्याचा अंदाज घेण्यात आला आहे. २००६ मध्ये खूपच कमी तळे असल्याचे समोर आले होते. ताज्या संशोधनात सॅटेलाइट डाटा आणि सुपर कॉम्प्युटर्सचा वापर करण्यात आला.