आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये पोलिस ठाण्यावर अतिरेकी हल्ला, 11 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या मुस्लिम बहुल झिनझियांग प्रांतातील पोलिस ठाण्यावर हातात कु-हाडी घेऊन आलेल्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस आणि नऊ अतिरेकी ठार झाले. या भयंकर हल्ल्यामुळे पाकव्याप्त काश्मीरला लागून असलेल्या चीनच्या पश्चिमेकडील भागातील तणाव कमालीचा वाढला आहे.
ऐतिहासिक रेशीम उद्योगाचे शहर काशगरपासून जवळच असलेल्या सेरीकबुया शहरातील पोलिस ठाण्यावर हातात कु-हाडी आणि तलवारी घेऊन आलेल्या अतिरेक्यांच्या नऊ सशस्त्र टोळ्यांनी शनिवारी हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन पोलिस जागीच ठार झाले तर अन्य दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात अल्बा फतेह नावाच्या अतिरेकी टोळीच्या नऊ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. या टोळ्या पाकव्याप्त काश्मीरला लागूनच राहतात. चीनने पूर्व तुर्कस्तानातील इस्लामिक चवळीला या हल्ल्यासाठी जबाबदार धरले आहे.