आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 वर्षांच्‍या चिमुकलीचा आयक्यू आईनस्‍टाईनपेक्षा जास्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनमधील एक 11 वर्षांची मुलगी चक्‍क प्रसिद्ध शास्‍त्रज्ञ अल्‍बर्ट आईनस्‍टाईपेक्षाही हुशार निघाली आहे. या मुलीचा आयक्‍यू आईनस्‍टाईन आणि स्‍टीफन हॉकिंग यांच्‍यापेक्षाही जास्‍त आहे. एका आयक्‍यू चाचणीमध्‍ये तिने 162 गूण मिळविले.

सेरिस पार्नेल असे या चिमुकलीचे नाव आहे. ती इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे. ती 'मेन्‍सा आयक्‍यू' चाचणीत सहभागी झाली. या चाचणीत सहभागी होण्‍यामागचे कारणही खास आहे. वडीलांचा 142 अंकांचा रेकॉर्ड ब्रेक करण्‍यासाठी तिने ही चाचणी दिली. परंतु, तिने केवळ वडीलांचा रेकॉर्ड ब्रेक केला नाही तर, सर्वोच्‍च स्‍कोर नोंदविला. तिने 162 अंक नोंदवून सर्वांनाच चकित केले. सिरिस याबाबत सांगते, 'माझे वडील खूप स्‍मार्ट आहेत. त्‍यांना हरविण्‍याचा माझा हेतू होता. पण, एवढ्या फरकाने मी त्‍यांना पराभूत करेन, असे वाटले नव्‍हते.'

आईनस्‍टाईन यांचा आयक्‍यू किती होता, हे नेमके कोणालाच ठावूक नाही. त्‍यांनी कधीही अशी चाचणी दिली नव्‍हती. परंतु, तज्‍ज्ञांच्‍या मते आईनस्टाईन यांचा स्‍कोर 160 च्‍या जवळपास असावा, असा अंदाज आहे.