आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 113 Year Old Woman Anna Stoehr Fudges Date Of Birth To Join Facebook In Divya Marathi

CRAZY GRANNY - 113 वर्षांच्या आजीबाईने खोटे वय सांगुन उघडले Facebook अकाऊंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मिन्नेसोता येथील रहिवाशी एन्ना स्टोएर)
न्यूयॉर्क - एन्ना स्टोअर नावाची 113 वर्षीय महिला फेसबुकवर अकाऊंट उघडत नसल्याने परेशान होती. याचे कारण होते तीचे वय. एन्ना यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1900 ला झाला आहे. मात्र फेसबुकवर 1 जानेवारी 1905 पासून पुढे जन्मलेले लोक अकाऊंट उघडू शकतात. शेवटी या वृध्द महिलेला आपले खोटे वय टाकावे लागले. एन्ना यांनी त्यांच्या जन्मतारीखमध्ये 1905 असे वर्ष टाकल्यानंतर त्यांचे फेसबुक अकाऊंट सुरू झाले. एका वृत्तवाहिनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिन्नेसोता येथील रहिवाशी असलेल्या एन्ना यांनी फेसबुकवर आपले वय कमी दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारे त्यांना त्यांचे स्वतःचे अकाऊंट सुरू करता आले.
इंटरनेट वापरणेही शिकल्या
एन्नाला फेसबुक वापरायला खुप आवडते. मात्र त्यांची इच्छा अत्ता पुर्ण झाली आहे. सोशल नेवटवर्कींगचा वापर आणि त्याचा उपयोग करून घेण्यासाठी व्हेरिझोन सेल्सच्या प्रतिनिधींचे एन्नाने धन्यवाद मानले आहे. यांच्या मदतीनेच एन्नाने इंटरनेट वापरणे, ई-मेल पाठवणे, गुगल सर्च फेसबुक इत्यादी गोष्टी शिकल्या आहेत. ऑनलाईन जगतात वृध्द तरूणी म्हणून ओळख असणार्‍या एन्ना आता आयपॅडच्या माध्यमातून सोशल नेटवर्कींगवर आपल्या कुटुंबाच्या मित्रांच्या संपर्कात राहातात.


पुढील स्लाईडवर पाहा, वृध्द तरूणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या एन्नाचे फोटो...