आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 113 Year Woman Marries 70 Year Toyboy After Six Months Romance

एक छोटी सी लव्ह स्टोरी, 70 वर्षीय आजोबा 113 वर्षांच्या आजीला म्हणाले, I LOVE U

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एक 'छोटी सी लव्ह स्टोरी' समोर आली आहे. 70 वर्षांच्या एका व्यक्तीने 113 वर्षांच्या महिलेला साथीदार बनवले आहे. या दोघांची प्रेमकहाणीही मोठी रंजक आहे. सुमारे सहा महिन्यांपेक्षाही कमी काळात त्यांच्या या लव्ह स्टोरीला यश आले.

ऐमती अहेमती (70) यांचे अजातिहान साउती (113) यांच्यावर प्रेम जडले. प्रेमही एवढे होते की ऐमती यांनी अजातिहान सारख्या डोळ्यासमोरच हव्या असे वाटायचे. दोघे शिनजियांग प्रांतातील बाचू जिल्ह्यात विवाह बंधनात अडकले. आठवडाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला.

सुरुवातीला दिला होता नकार
एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या दोघांची पहिली ओळख चीनच्या एका रुग्णालयात झाली होती. तेथेच दोघांचे प्रेम जुळले. अजातिहान यांनी सुरुवातीला ऐमती यांच्याशी फार जवळीक निर्माण केली नाही. कारण आपण ऐमतीपेक्षा खूप वयस्त असल्याचे त्यांना माहिती होते. पण ऐमती ऐकणार नव्हते. त्यांनी अजातिहान यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला पण त्यांनी नकार दिला.

मग दिला होकार
सहा महिने ऐमतीला वाट पाहायला लावल्यानंतर गेल्यावर्षी एप्रिल मिहन्यात अजातिहान यांनी विवाहाला होकार दिला. त्यानंतर दोघे विवाहबंधनात अडकले. ऐमती सांगतात, आम्ही दोघे खूप खुश आहोत. ती माझ्याहून मोठी असली तरी त्याने मला काही फरक पडत नाही. ऐमती यांच्या पहिल्या प्रस्तावाला लाजून नकार दिल्याचे त्या सांगतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या जोडीची काही छायाचित्रे...