आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल अवीव : बसमध्ये १२ जणांना भोसकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल अवीव - येथील बसमध्ये एका अरब व्यक्तीने १२ इस्रायलींना चाकूने भोसकल्याची घटना घडली. इस्रायलमधील गजबजलेल्या बाजारपेठेत दहशतवादी हल्ला होण्याची ही अलीकडील ताजी घटना आहे.

१२ पैकी दोघे गंभीर जखमी झाले असून अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती बचाव सेवेचे प्रवक्ते मॅगन डेव्हिड अॅडोम यांनी दिली. दक्षिण तेल अवीवच्या मेनचेम बेगिन रस्त्यावर हा हल्ला झाला. हल्लेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यास पकडले. त्याची चौकशी केली जात आहे.

२३ वर्षांचा हल्लेखोर वेस्ट बँक सिटीच्या तुलकरम भागात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भोसकण्याच्या कृत्याकडे दहशतवादी हल्ला म्हणूनच पाहिले जाईल, असे इस्रायलने म्हटले आहे.
रोसेनफील्ड यांनी टि्वटरवर सांगितले. गेल्या वर्षी जूनमध्ये तीन इस्रायलींचे अपहरण करून हत्या केल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये नव्याने तणाव निर्माण झाला आहे. यानंतर गाझापट्टीमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर सलग ५० हल्ले चढवण्यात आले.