आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Year Old Girl And Boy Aged 13 Have Baby Daughter Together

ऐकावे ते नवलच! प्राथमिक शाळेतील 12 वर्षीय विद्यार्थिनीने दिला कन्येला जन्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ऐकावे ते नवलच! ब्रिटनमध्ये एका प्राथमिक शाळेतील 12 वर्षीय विद्यार्थिनीने एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कन्येचा पिता फक्क 13 वर्षांचा आहे. ब्रिटनमधील हे जोडपे सगळ्यात कमी वयाचे जोडपे ठरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी नॅंसी जोसफ (नाव बदलले आहे) हिला वयाच्या 11 वर्षीच दिवस गेले होते. ती 12 वर्षांची असताना तिने एका कन्येला जन्म दिला. नवजातशिशुचे वजन सात पाउंड आहे. विशेष म्हणजे बाळ आणि बाळंतीन ठणठणीत आहे.
नँसीचे जॉनसोबत (नाव बदलले आहे) प्रेमसंबंध आहे. जॉन नववीचा विद्यार्थी असून तो 13 वर्षाचा आहे. तो दुसर्‍या शाळेत शिकतो. ख्रिसमसच्या कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती. तेव्हा नॅंसी 10 तर जॉन 11 वर्षांचा होता.
या अनोख्या घटनेमुळे संपूर्ण जगात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नॅंसीची आई 27 व्या वर्षीच आजी बनली आहे. ब्रिटनमधील ती सगळ्यात कमी वयाची आजी ठरली आहे. सगळ्यात कमी वयाची आई म्हणून नॅंसीने नोंदणी करून घेतली आहे.
नँसी आणि जॉन यांच्या कुटूंबियांनी नवी पाहुणीचे धुमधडाक्यात स्वागत केले आहे. एवढेच नव्हेतर नॅंसी आणि जॉन मोठे झाल्यानंतर त्यांचा विवाह लावून देण्याचाही निर्णय दोघांच्या कुटूंबियांनी घेतला आहे.

आपल्याला माहीत आहे काय?
2006 मध्येही अशाच प्रकारची घटना उघडकीस आली होती. एडिनबर्गमध्ये 12 वर्षीय ट्रेसा मिडिलटन हिने एका बालकाला जन्म दिला होता. दुसरीकडे सगळ्यात कमी वयाचा पिता म्हणून बेडफोर्डमधील सीन स्टीव्हर्ट यांनी विक्रम केला होता. 1998 मध्ये स्टीव्हर्ट 12 वर्षीच पिता बनला होता.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, जगातील सगळ्यात कमी वयाच्या मातांबाबत...