आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडनीत ओलीसांची १७ तासांनंतर मुक्तता, हल्लेखोराला कंठस्नान तर दोन ओलीसही ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: लिंट कॅफेतून बाहेर येताना ओलिस)

सिडनी - ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर सिडनीतील कॅफेमध्ये एका बंदूकधा-याने ओलीस ठेवलेल्या सर्व लोकांची तब्बल १७ तासांच्या कारवाईनंतर सुटका करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी हे ओलीसनाट्य संपुष्टात आल्याची घोषणा केली. पोलिस आणि बंदूकधाऱ्यामध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले.
या कारवाईत बंदूकधारीही मारला गेल्याचे वृत्त आहे. तो इराणी वंशाचा असून हारुण मोनिस असे त्याचे नाव आहे. या ओलिसांमध्ये दोन भारतीयही होते. ते दोघेही सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी नवी दिल्लीत सांगितले. त्यापैकी अंकित रेड्डी असे एकाचे नाव आहे. तो इन्फोसिसचा कर्मचारी आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता सिडनीच्या लिंट चॉकलेट कॅफेत बंदूकधाऱ्याने १५ लोकांना ओलीस ठेवले होते. त्यापैकी ५ जण निसटण्यात यशस्वी ठरले होते.

जो आहे तो फक्त अल्लाह आहे
बंदूकधाऱ्याने खिडकीवर काळा झेंडा लावला होता. काहींच्या मते तो इसिसच्याच ‘इस्लामी शहादा’चा आहे. ‘फक्त अल्लाह आहे’ असे लिहिलेला झेंडा अतिरेकी संघटनेचा नाही, असे काहींना वाटते.

कमांडोंच्या कारवाईत बंदूकधाऱ्याचा खात्मा
बंदुकधारी शेख हारुण मोनिस कमांडो कारवाईत ठार झाला. त्याने माध्यमांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मागण्यांचे थेट प्रसारण करण्याची मागणीही केली होती.

भारतीय क्रिकेटपटूंच्या सुरक्षेत वाढ
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत या ओलीस नाट्यानंतर वाढ करण्यात आली आहे. भारतीय संघ सध्या ७०० किमी लांब ब्रिस्बेन शहरात आहे. अतिरिक्त पोलिस दलाचे कवच भारतीय संघाला पुरवण्यात आले आहे.

दुसरीकडे, बेल्जियममधील खेंट शहरात चार शस्त्रधारी दहशतवाद्यांनी एक अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून एका व्यक्तीला वेठीस धरल्याची माहिती मिळाली आहे.
40 जणांना ओलिस ठेवणार्‍या सुसाईड बेल्टधारी दहशतवाद्याची ओळख पटली आहे. हल्लेखोराने नाव शेख हारुन मोनिस तो इराणी असल्याचा खुलासा ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने केला आहे. शेख मोनिस हा हायटेक दहशतवादी असून त्याच्या हातात आयपॅड दिसल्याचा दावा मीडियाने केला आहे. शेख मोनिस याने पहिल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचीही माहिती मिळाली आहे.
स्वत:ला मुस्लिम धर्मगुरु म्हणून घेणारा शेख मोनिस हा 49 वर्षाचा आहे. सिडनीमधील नेऋत्य भागातील रहिवासी आहे. 1996 मध्ये तो इराण म्हणून ऑस्ट्रेलिया आला होता.

अफगानिस्तानातील युद्धाच्या काळात त्याने ऑस्ट्रेलियाचे सैन्य तैनात करण्यास विरोध दर्शवला होता. एवढेच नाही तर मोनिस याने युद्धात शहीद झालेल्या ऑस्ट्रेलियन जवानांच्या कुटुंबियांना संतप्त ई-मेल देखील केले होते . या काळातच तो पोलिसांसमोर आला होता. पोलिसांनी त्याला शेवटचे पहिल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपा खाली अटक केले होते. मोनिस याच्यावर सात महिलांचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे.

दरम्यान, दिवस मावळताच लिंट चॉकलेट कॅफेमध्ये अंधार पसरला होता. त्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे मदत कार्याचा वेग मंदावला होता. ऑस्‍ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एॅबॉट यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. तसेच ओलिसांसाठी परभेश्वाराकडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.

संध्याकाळ होताच लाइव्ह अपडेट्‍स झाले बंद...
लिंट कॅफेसमोर 'चॅनल 7'चे न्‍यूजरूममधून पत्रकार ख्रिस रीजन सकाळपासून या घटनेचे थेट प्रक्षेपण दाखवत होते. मात्र, सायंकाळी कॅफे परिसरात अंधार पसरला आहे. त्यामुळे अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सुरुवातील ऑस्ट्रेलियन सरकारने या घटनेच्या थेट प्रक्षेपणास बंदी घातली होती. मात्र, ख्रिस रीजन यांना न्‍यूजरूममध्ये परत जाण्याची परवानगी मिळाली आणि त्यांना रेडिओच्या माध्यमातून थेट माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ख्रिस यांनी सांगितले की, पाच ओलिसांनी दहशतवाद्यांच्या तावडीतून स्वत:ची सुखरुप सुटका करून घेतले आहे. त्यामुळे दहशतवादी संतापले होते. सायंकाळी कॅफेलील लाइट बंद होण्यापूर्वी कॅफे बाहेरील दृश्ये दाखवण्यात आली होती. दहशतवादी एक-एक करून ओलिसांना खिडकी समोर उभे करत होते. ओलिसांसाठी जेवण नेतानही ख्रिस याने न्यूजरुममधून पाहिले होते.

दहशतवाद्यांची अट..
दहशतवाद्यांनी जवळपास सहा तासांनंतर पोलिसांशी संपर्क साधला. वेठीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी अट ठेवली आहे. ऑस्‍ट्रेलियन सरकारला आयएसआयएसचा झेंडा सोपवणे आणि पंतप्रधानासोबत संवाद साधण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांची मागणी सार्वजनिक न करण्याचे निर्देश मीडियाला देण्यात आले आहेत.

दरम्यान, ओलिस असणार्‍यांमध्ये इन्फोसिस कंपनीचा एक भारतीय आहे. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत 'इन्फोसिसने' अद्याप खुलासा दिलेला नाही. यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाशी संपर्कात असल्याचेही नायडू म्हणाले आहेत.
बंदुकीचा धाक दाखवून या नागरिकांना ओलिस ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून बचावकार्य सुरु असून, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबॉट यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ओलिस ठेवलेल्यांमध्ये कॅफेतील दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ओलिस ठेवलेल्या नागरिकांचा नेमका आकाडा आता सांगणे अवघड असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली असल्याचे वृत्त आहे.
व्हिडिओ पाहा शेवटच्या स्लाईडवर...

कॅफेमध्ये अरबी भाषेतील अक्षरे लिहिलेले काही काळे झेंडे दिसून आल्याचेही सांगण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये ISIS चा हात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
कॅफे ज्या परिसरात आहे ते मार्टिन प्लेस हे सिडनीतील आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या अशा इमारती आहेत. न्यू साऊथ वेल्स पार्लामेंटही याच परिसरात आहे. अमेरिकन दुतावास, देशाची मध्यवर्ती बँक आणि द कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया हेही याच परिसरात आहे.
दरम्यान कॅफेकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून या भागात असणारी सर्व कार्यालये रिकामी करण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपास असणारा परिसरही रिकामा केला आहे. तसेच या ठिकाणापासूनच जवळ असलेले प्रसिद्ध सिडनी ओपेरा हाऊसही रिकामे करण्यात आले असून तेथील शोही रद्द करण्यात आले आहेत. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ख्रिसमस आठवडाभरावर येऊन पोहोचल्यामुळे या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे.

पंतप्रधान टोनी अबॉट यांनी तातडीने राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात बैठक बोलावली असून त्यात कारवाईबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या घटनेबाबत सविस्तर माहिती पंतप्रधानांनी घेतली.

पंतप्रधानांचे आवाहन
ऑस्ट्रेलिया हे एक शांत शहर आहे. अशा प्रकारचा कोणताही भ्याड हल्ला या शहराला बदलू शकत नाही. त्यामुळे अशा भीतीला भीक न घालता सर्व नागरिकांनी आपली कामे सुरळीत सुरू ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान टोनी अबॉट यांनी केले आहे. तसेच हा हल्ला कशासाठी करण्यात आला त्यामागे काही राजकीय हेतू आहे का, हेही तपासून पाहिले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
टीम इंडियाची सुरक्षा वाढवली
भारतीय क्रिकेटसंघ सध्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. दुस-या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेटसंघ ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, मार्टिन प्लेस येथे लिंड्ट कॅफेमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या सुरक्षेतही मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा घटनेचे फोटो....
व्हिडिओ पाहा शेवटच्या स्लाईडवर...
MEA helpline for Indians in Sydney: 0061481453550